शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 15:05 IST

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर यांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांच्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. डॉक्टरांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना संतप्त नातेवाईकांनी त्यांना धक्काबुक्की केली.

कोल्हापूर - कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांच्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव  निर्माण झाला आहे. काही डॉक्टरांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना संतप्त नातेवाईकांनी त्यांना धक्काबुक्की केली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. 

दरम्यान सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे हे शासकीय कामानिमित्त मुंबईला गेले होते. रुग्णाचे नातेवाईक आणि पीपल्स पिरपिब्लक पार्टीचे जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ते मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी निघाले आहेत. त्यांची भेट घेवून पुढील कार्यवाही झाल्यानंतरचं मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे भास्कर यांनी सांगितले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत मृतदेह शवगृहात ठेवण्यात आला होता.

नामदेव भास्कर यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. पुन्हा त्यांच्या पायाला गाठ उठल्याने त्यांना १६ मे रोजी रात्री सीपीआर रुग्णालयात दाखल केले. गेली चार दिवस त्यांच्या पोटात अन्न नव्हते. डॉक्टरांनी सलाईनही लावली नाही. फक्त औषधे दिल्याने त्यांची प्रकृत्ती अत्यावस्थ झाली. याठिकाणी चार ते पाच डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत असतात. चार दिवस डॉक्टरांनी त्यांचेकडे दुर्लक्षच केल्याने मंगळवारी सकाळी नामदेव भास्कर यांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती समजताच सीपीआरमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने रुग्ण दगावलेचा आरोप करीत गोंधळ घातला. येथील डॉक्टर गिरीश कांबळे, डॉ. बरगे, डॉ. मेंचू, डॉ. घोरपडे यांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता संतप्त नागरिकांनी शिव्यांची लाखोली वाहत त्यांना धक्काबुक्की केली. वादावादी वाढल्याने खासगी सुरक्षारक्षकांनी धाव घेत जमावाला पांगवले. सीपीआरच्या शवगृहात मृतदेह ठेवला होता. अधिष्ठाता डॉ. लोकरे यांची भेट घेवूनचं मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे डी. जी. भास्कर यांनी सांगितले. मृत नामदेव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

नेत्रदानाचा निर्णय 

नामदेव भास्कर यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात डॉक्टरांवर आरोप केल्याने वातावरण तापले होते. दुपारी बाराच्या सुमारास नातेवाईकांनी मृत नामदेव यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेत्रदान केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल