शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

UAEच्या राष्ट्रपतींच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर, शाहू स्मृती शताब्दीनिमित्तचे आजचे कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 11:52 IST

कोल्हापूर : संयुक्त अरब अमीरातचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे काल, शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या ...

कोल्हापूर : संयुक्त अरब अमीरातचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे काल, शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज, शनिवारी (दि.१४) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शाहू स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित कोल्हापुरातील आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापुरात गेल्या पंधरा दिवसापासून विविध कार्यक्रम सुरु आहेत. याकार्यक्रमातून शाहूंच्या विचाराचा जागर सुरु आहे. आज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत १२ राज्यातील लोककलावंतांचा होणारा कार्यक्रम, केशवराव भोसले नाट्यगृहात होणारे संगीत स्वयंवर नाटक व पापाची तिकटी येथील शाहिरी पोवाडा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यातील १२ राज्यांतील लोककलावंतांचा कार्यक्रम उद्या, रविवारी  सायंकाळी ६ वाजता होणार आहे.UAEमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाराष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सरकारने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे १६ वे शासकशेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी ३ नोव्हेंबर २००४ पासून देशाचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. १९४८ मध्ये जन्मलेले शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे १६ वे शासक होते. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या कार्यकाळात यूएई आणि अबू धाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या. त्यांच्या कार्यकाळातच यूएईचा एवढा विकास झाला की, इतर देशांतील लोकही याठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर