शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गवा रेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू, झुंजीमुळे पाच गुंठ्यातील ऊस पिकाची नासधूस; पन्हाळ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 16:43 IST

गव्यांच्या झुंजीमुळे त्या ठिकाणचा सुमारे पाच गुंठ्यातील ऊस पिकाचे नुकसान

बाजारभोगाव : दोन गवा रेड्यांच्या झुंजीत एका गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव जवळील पोहाळे तर्फ बोरगाव या दोन्ही गावांच्या हद्दीत तानाजी सावू पाटील यांच्या शिव नावाच्या शेतात ही घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली. गव्यांच्या झुंजीमुळे त्या ठिकाणचा ऊस भुईसपाट झाला आहे. सुमारे पाच गुंठ्यातील ऊसाच्या पिकाची नासधूस झाली.आज, सकाळी शेतीकामासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ वनकर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. याघटनेची माहिती मिळताच वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलीक कांबळे, महादेव कुंभार, संगिता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील, यशवंत पाटील, शंकर पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता गव्यांच्या अंगावर शिंग लागल्याच्या खुणा आढळल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीत रानभरे यांनी मृत गव्याची तपासणी केली.जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढला आहे. अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. दोन दिवसापुर्वीच पन्हाळ्याच्या दक्षिण बाजूकडील पायथ्याशी असलेल्या वाघवेजवळच्या डोंगरात तीस गव्यांचा कळप नागरिकांच्या निदर्शनास आला होता. गव्यांकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर