शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा आरळेत गव्याचा मृत्यू, वन्यप्रेमींमध्ये हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 11:25 IST

पाण्याच्या शोधात गवा भरकटल्याचा अंदाज

निवास वरपे म्हालसवडे : कसबा आरळे (ता. करवीर) येथे शिवारात  चार वर्षे वयाच्या मादी गव्याचा मृत्यू झाला. फुफुसाचा आजार असल्याने गव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. गव्याच्या मृत्यूने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.कसबा आरळे गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील मल्लेवाडी येथील जंगली भागांमध्ये गव्यांचे वस्तीस्थान आहे. त्या परिसरातील जंगली भागामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने गवे तुळशी नदी शेजारील तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी, पाली, कसबा आरळे या परिसरात भटकू लागले आहेत. काल, सोमवारी दुपारी पाण्याच्या शोधात ओढ्याच्या काठाने फिरत असलेला गवा नागरिकांच्या निदर्शनास आला होता. दरम्यान ग्रामस्थांनी वन्यजीव बचाव पथक व वन विभागाला याची माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ओढ्याच्या काठाने दिवसभर फिरणारा गवा उसाच्या शेतात जाऊन बसला होता. सायंकाळच्या सुमारास हा गवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना लिंग दळा नावाच्या शेतात मृतावस्थेत आढळला. पशुधन विकास अधिकारी युवराज शेट्टे, डॉ. प्रशांत लंबे यांनी मृत गव्याचे शवविच्छेदन केले. वनरक्षक आर. के. जोनवाल, वनक्षेत्र अधिकारी आर. एस. कांबळे, विजय पाटील, युवराज भोगम, एकनाथ जाधव यांनी या घटनेचा पंचनामा केला. सायंकाळी  वनक्षेत्रपालांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने गव्याचे दहन केले. 

पाण्याच्या शोधात उन्हातून फिरत असणारा भरकटलेला हा गवा असावा.  फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. - डॉ. युवराज शेट्टे, पशुधन विकास अधिकारी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग