इचलकरंजी : अब्दुललाट येथील दिलीप लक्ष्मण कोळी (वय ५८) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे साहाय्यक महाप्रबंधक प्रकाश कोळी यांचे ते बंधू होत. (फोटो : ३००३२०२१-कोल- दिलीप कोळी निधन)
बेगमबी पठाण
कोल्हापूर : कसबा बावडा येथील बेगमबी सरदारखान पठाण (वय ९२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे हा परिवार आहे. जियारत विधी आज बुधवारी आहे. ज्येष्ठ छायाचित्रकार राज मकानदार यांच्या त्या आजी होत. (फोटो: ३००३२०२१-कोल- बेगमबी पठाण निधन)
बाळाबाई कुंभार
काेल्हापूर: शाहुपुरी आठवी गल्ली येथील बाळाबाई संभाजी कुंभार (वय ६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात बहीण, भाऊ, पुतणे, भाचे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, गुरुवारी आहे. (फोटो : ३००३२०२१-कोल- बाळाबाई कुंभार निधन)
शुभांगी पराडकर
कोल्हापूर : शाहूपुरी येथील शुभांगी रामचंद्र पराडकर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे. (फोटो : ३००३२०२१-कोल-शुभांगी पराडकर निधन)
उज्ज्वला मोरे
निपाणी : श्रीनगर प्रभागातील निवृत्त प्राध्यापक शिवाजीराव मोरे यांच्या पत्नी उज्ज्वला मोरे (वय ५७) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, नात, दीर ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे, भावजयी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, गुरुवारी आहे.
(फोटो: ३००३२०२१-कोल-उज्ज्वला मोरे निधन)