शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:58 IST

दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देदिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यूगौरवाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते

कोल्हापूर: दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.यासंदर्भात दिल्लीत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी, दिल्लीत देशभरातील १८0 शेतकरी संघटनांनी शुक्रवारी संसद घेराओ मोर्चा काढला. या मोर्चात कोल्हापुरातून विशेष रेल्वेने शेतकरी गेले होते. त्यांची राहण्याची सोय आंबेडकरभवन येथे करण्यात आली होती.

येथे ५00 ते ६00 शेतकरी वास्तव्यास होते. मोर्चानंतर सर्व शेतकरी झोपे गेले होते. अकराच्या सुमारास किरण गौरवाडे बाहेर आले. गॅलरीमध्ये तंबाखू खाउन थुकत असताना त्यांचा तोल जाउन चौथ्या मजल्याने ते खाली कोसळले. सर्व शेतकरी झोपी गेल्याने याची कुणालाच कांही कल्पना आली नाही.पहाटे तीनच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व शेतकऱ्याना याची कल्पना दिली. डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तातडीने पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

ही घटना समजल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांनी धाव घेउन सर्व माहिती घेतली. श्रध्दांजली वाहिल्यानंतर दुपारी विशेष विमानाने प्रेत शिरोळकडे रवाना करण्यात आले. गौरवाडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक  मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर