खाटांगळेत दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By Admin | Updated: June 16, 2014 00:52 IST2014-06-16T00:49:50+5:302014-06-16T00:52:14+5:30

पाण्याच्या चावीस मोटर जोडताना दुर्घटना

Death due to electric shocks in the kitchen | खाटांगळेत दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

खाटांगळेत दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सांगरूळ : खाटांगळे (ता. करवीर) येथे पाण्याच्या चावीला मोटर जोडताना विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. मयूरेश विठ्ठल पाटील (वय १५) व विश्वनाथ विठ्ठल पाटील (६०) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना आज, रविवारी दुपारी सव्वाचार वाजता घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : मयूरेश पाटील याचे खाटांगळे पैकी परशराम नगर येथे घर आहे. मयूरेश आमशी (ता. करवीर) येथील साईसंकुल येथे कुस्तीच्या सरावासाठी वसतिगृहात राहायला होता. दोन दिवसांची सुटी घेऊन तो आपल्या घरी आला होता. दुपारी चार वाजता चावीला पाणी आले होते. चावीला पाणी कमी दाबाने येत असल्याने मोटर जोडावी लागते.
चावीला मोटर जोडत असताना मयूरेशला विजेचा धक्का बसला. तो वायरला चिकटून तडफडत होता. याच दरम्यान त्याच्या घराशेजारी विश्वनाथ पाटील हे जनावरांसाठी वैरणीचा भारा घेऊन चालले होते. त्यांना मयूरेश तडफडत असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर भारा रस्त्यातच टाकून त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. त्यामध्ये दोघेही जमिनीवर कोसळले. ते धडपडताना पाहून शेजारील मुलगा संदेश पाटील याने विजेचा बटन बंद केले. दोघांना तातडीने सीपीआर येथे उपचारासाठी नेले; मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. (वार्ताहर)

Web Title: Death due to electric shocks in the kitchen