कोल्हापूर : सार्वजनिक तरुण मंडळाचा बंद पडलेला एलईडी दुरूस्त करीत असताना काल रविवार रात्री विजेचा धक्का बसूननिखील शिवाजी पाटील (वय २४, रा. गणेश कॉलनी, साने गुरुजी वसाहत) या गणेशभक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी सांगितले, साने गुरुजी वसाहत येथील रावजी मंगल कार्यालयाच्या पिछाडीस गणेश कॉलनी आहे. येथील अर्जुन ग्रुप गणेश मंडळाने सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यासाठी स्वतंत्र मंडप उभा केला आहे. काल रात्री दहाच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते मंडपात एकत्र बसले होते. यावेळी निखील विद्युतप्रवाह सुरू ठेऊन बंद पडलेला एलईडी दुरूस्त करू लागला. काही क्षणातच त्याला विजेचा जोराचा धक्का बसून तो खाली पडला. या प्रकाराने कार्यकर्ते भांबावून गेले. काहींनी प्रसंगावधान ओळखून वीजप्रवाह बंद केला. बेशुध्द अवस्थेत पडलेल्या निखीलला सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू हौस नडलीनिखील हा कॉम्प्युटर इंजिनिअर असल्याने बंद पडलेला एलईडी दुरूस्त करण्यास त्याने घेतला. यावेळी इतर मित्रांनी त्याला विरोध केला. तुला त्यातील काही समजणार नाही, चांगल्या इलेक्ट्रीक मिस्त्रीला दाखवू असे सांगितले. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत दुरूस्त करण्यास घेतला आणि हौस जिवावर बेतली. चक्कर येवून गणेशभक्ताचा मृत्यू / हॅलो १
विजेच्या धक्क्याने गणेशभक्ताचा मृत्यू
By admin | Updated: September 2, 2014 00:29 IST