शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विहीरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, आत्महत्या की घातपात पोलिसांसह ग्रामस्थांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 13:18 IST

बहिरेश्वर ता करवीर येथील नामदेव सणगर वय ६५ या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहीरीत मृतदेह आढळला.

कसबा बीड : बहिरेश्वर ता करवीर येथील नामदेव सणगर वय ६५ या शेतकऱ्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वतःच्या विहीरीत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.    घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार,मयत नामदेव सणगर हे शनिवारी रात्री ११वाजता घरातून शेताला पाणी पाजून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले.त्यांचे पुतणे नागेश सणगर ही शेताला पाणी पाजण्यासाठी रात्री शेतावर आले होते.विहीरीवर मोटार सुरू करत असतानाच मयत नामदेव सणगर हे पाण्यावर तरंगत असलेले पुतणे नागेश सणगर यांच्या निदर्शनास आले, त्यावेळी त्यांनी तात्काळ त्यांचा‌ मुलगा मनोहर सणगर याला कळविले.

त्यानंतर गावकामगार पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार यांनीही माहिती घेऊन करवीर पोलिस ठाण्यात वर्दी दिली.  सकाळी पहाटे करवीर पोलिस आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.त्यावेळी त्यांचे दोन्ही पाय व डाव्या हात साडीच्या दोरीच्या सहाय्याने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. 

पुढील तपास करणेसाठी पोलिस प्रशासनाकडून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते,पण श्वान त्यांच्या घरी जाऊन घुटमळले ..सदरचा पंचनामा गावकामगार पोलिस पाटील व पंच यांचे समवेत करून मृतदेह शवविच्छेदन करणेकामी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल. बघ्यांची गर्दी झाली होती.पोलिस वरिष्ठ अधिकारी अॅडीशनल एस.पी जयश्री देसाई, उपाधिक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक निवास पोवार करत आहेत.