शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग दिवस : पाच तास पॅराग्लायडिंग करत दृष्टिदिव्यांग झेपावले हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 14:45 IST

बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा या महाराष्ट्र गीतात कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गगनभेदि गिरिविण अपुनच जिथे उणे, आंकाक्षापुढति जिथे गगन ठेंगणे या काव्यपंक्तिची अनुभूती तीन दृष्टिदिव्यांगांनी पॅराग्लायडिंग करत हवेत झेपावत घेतली.

ठळक मुद्देपाच तास पॅराग्लायडिंग करत दृष्टिदिव्यांग झेपावले हवेतहवाई सफरीचा घेतला आनंद : कोल्हापूरच्या सतिश नवलेंची संकल्पना

संदीप आडनाईककोल्हापूर : बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा या महाराष्ट्र गीतात कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गगनभेदि गिरिीविण अपुनच जिथे उणे, आंकाक्षापुढति जिथे गगन ठेंगणे या काव्यपंक्तिची अनुभूती तीन दृष्टिदिव्यांगांनी पॅराग्लायडिंग करत हवेत झेपावत घेतली.जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने पुण्याजवळील कामशेतच्या परिसरात प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड आणि निर्वाणा अ‍ॅडव्हेंचर्समार्फत तीन दृष्टिदिव्यांगासह पाचजणांनी पॅराग्लायडिंगचा अनुभव घेतला. प्रेरणाचे प्रमुख सतिश नवले यांनी दहा वर्षापूर्वी ही संकल्पना मांडली होती. तिला निर्वाणा अ‍ॅडव्हेंंचर्सचे संजय राव यांनी पाठबळ दिले.

कामशेतपासून १0 किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीमध्ये कोल्हापूरचे सतिश नवले, पुण्याचे मिलिंद कांबळे आणि पूनम खुळे या तीन दृष्टिदिव्यांगानी पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने जवळपास १000 फूट उंच हवेत पाच तास विहरण्याचा आनंद घेत दिव्यांग दिवस साजरा केला. त्यांच्यासोबत सुनील रांजणे आणि शिवाजी करडे या डोळस व्यक्तींनीही हवेत विहार करण्याचा आनंद घेतला.

या साहसी उपक्रमासाठी निर्वाणाचे रवि शेलार, विनोद आणि बाळू या पायलटनी या दृष्टिदिव्यांगाना सहाय्य केले. सकाळी ८.३0 वाजता त्यांनी पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने पहिली झेप घेतली.

दुपारी १.३0 वाजेपर्र्यत सर्वांनी या साहसाचा अनुभव घेतला. लेफ्ट आणि राईट कंट्रोल कसे करायचे, वॉकी टॉकीचा वापर तसेच वातावरणातील बदल कसे झेलायचे याचे पूर्वप्रशिक्षण नसतानाही या दिव्यांगांनी १00 हून अधिक प्रत्यक्षदर्शीच्या उपस्थितीत हा थरार अनुभवला.

पूनमने केले थेट रस्त्यावर लँडिंगया उपक्रमात सहभागी झालेल्या पूनम खुळे ही दृष्टिदिव्यांग तरुणी पॅराग्लायडिंग करत थेट रस्त्यावर उतरली. इतर दोघे मात्र दरीच्या वर सपाट भागात उतरले. 

आम्ही जेव्हा हवेत झेप घेतली, तेव्हा त्यातील गंमत आम्ही अनुभवली. काही मर्यादा होत्या, पण आम्हा दृष्टिदिव्यांगाना पॅराग्लायडिंगची भीती वाटली नाहे. अशा साहसी उपक्रमात सहभागी झाल्याने उलट आमचा आत्मविश्वास वाढला.सतिश नवले,प्रमुख,प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लार्इंड

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणे