शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

दिवसा स्नॅचिंग; रात्री लूटमार

By admin | Updated: April 7, 2015 01:10 IST

चोर झाले शिरजोर : गस्तीवरील पोलिसांचा ‘टाईमपास’ संपणार कधी ?

एकनाथ पाटील- कोल्हापूर -शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी दिवस-रात्र शहरात फेरफटका मारणारे गस्तीवरचे पोलीस सध्या ‘टाईमपास’ करू लागल्याने चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. त्यांचा हा ‘टाईमपास’ नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थीती आहे. ते कोठे असतात याची शहानिशादेखील होत नाही. त्यामुळे गस्तीवरील पोलीस आॅन ड्यूटी घरी किंवा इतर वैयक्तिक कामातच गुंतल्याची चर्चा आहे.शहरात गेल्या चार दिवसांपासून करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिंगणापूर येथील गोडावूनसह फुलेवाडी रिंगरोड परिसरात भरदिवसा प्लॅट फोडून चोरट्यांनी १२ तोळे दागिने लंपास केले. त्या पाठोपाठ राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राजोपाध्येनगरात एकाच दिवशी चेन स्नॅचिंगच्या तीन घटना घडल्या. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तर चोरट्यांनी कहरच केला आहे. साईक्स एक्स्टेंशन परिसरात घरफोडीसह एकाच दिवशी परीख पूल, वटेश्वर मंदिर व बागल चौकात पत्ता विचारण्याचा बहाणा करून भरदिवसा नागरिकांच्या बॅगा लंपास केल्या. चेन स्नॅचरच्या घटनांमुळे महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षित झाले आहे. रोजच्या घरफोड्या व चेन स्रॅचरच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. चाप कोण लावणार ?शहरात पाच पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार दिवस-रात्र परिसरामध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली जाते. ही पथके नेमकी असतात कोठे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. दिवस-रात्र गस्तीवरचे पोलीस ‘टाईमपास’ करूलागले आहेत. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. ते कोठे असतात याची शहानिशादेखील केली जात नाही. गस्तीवरील पोलिस आॅन ड्यूटी कमी आणि घर आणि हॉटेल-लॉजमध्ये त्यांचा वावर असल्याची चर्चा आहे. वायरलेसवरून त्यांना विचारणा केल्यास ते परिसरात फिरत असल्याचा संदेश देतात. अशा कामचुकार आणि टाईमपास पोलिसांना चाप लावणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरात घरफोड्या व चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. यापूर्वीही चुकीचे लोकेशन सांगून ‘टाईमपास’ करणाऱ्या गस्तीवरच्या पोलिसांवर कारवाई केली आहे. यातूनही काही पोलीस ‘टाईमपास’ करीत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गस्तीवरील पथकावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. तसेच दिवसांतून तीनवेळा नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. - भरतकुमार राणे, शहर पोलीस उपअधीक्षक