इचलकरंजी : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट ॲण्ड इंटिग्रेेटेड टेक्स्टाईल पार्क (मल्टीस्टेट) संस्थेची सन २०२१-२०२६ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. या सभेनंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गणपती कलागते यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण काकडे यांनी काम पाहिले.
संस्थापक आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पंचवार्षिक निवडणुकीसाठी संस्थेच्या १५ जागांसाठी २६ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आवश्यक १५ जागांइतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी येथील पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नूतन संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली.
नूतन संचालक मंडळ सर्वसाधारण गटामध्ये प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, विलास गाताडे, सर्जेराव पाटील, रमेश कबाडे, सुरेश बावणे, महावीर यळरुटे, सुमेरू पाटील, बाळासाहेब माने, नरसिंह पारीक, अशोक नारे, महिला गटामध्ये शकुंतला जाधव, सुवर्णा पाटील. अनुसूचित जाती गटामध्ये महादेव कांबळे, संस्था गटामध्ये चंद्रकांत इंगवले यांचा समावेश आहे.
या निवडीनंतर आमदार आवाडे व काकडे यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, सुनील पाटील, सतीश कोष्टी, अहमद मुजावर, आदी उपस्थित होते.
फोटो
२४०२२०२१-आयसीएच-०१ - प्रकाश दत्तवाडे
२४०२२०२१-आयसीएच-०२ - बाळासाहेब कलागते