शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri -दसऱ्याची लगबग सुरू; बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:30 IST

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या नवरात्रौत्सवात आता दसऱ्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी  मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने तयार कपडे, एलईडी टीव्ही, ड्रायफु्रट्स, फळे, आदी नानाविध वस्तूंची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे.

ठळक मुद्देदसऱ्याची लगबग सुरू; बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साहविधानसभा निवडणूक, नवरात्रौत्सवाचा प्रभाव

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या नवरात्रौत्सवात आता दसऱ्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी  मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने तयार कपडे, एलईडी टीव्ही, ड्रायफु्रट्स, फळे, आदी नानाविध वस्तूंची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत आहे.आॅगस्ट महिन्यात पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गाचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांना व व्यापाऱ्यांना महिनाभरापेक्षाही अधिकचा काळ लागला. त्यामुळे एकूणच बाजारपेठेवर मंदीचे सावट होते.

हे सावट विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात दूर झाले. त्यानंतर २९ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. या दोन्हींच्या एकत्रित प्रभावामुळे बाजारपेठेवरील मंदीचे सावट दूर होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाद्वार रोड, जोतिबा रोड, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, शाहूपुरीतील तयार कपड्यांची दुकाने, भांड्यांची दुकाने व ड्रायफु्रट्स दुकाने व शहरातील विविध मॉल्समध्ये वस्तुखरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत.

विशेषत: मॉल्समध्ये खरेदीसाठी अधिक गर्दी होऊ लागली आहे. यासोबतच शिवाजी स्टेडियम, उमा टॉकीज, शाहूपुरी, शिवाजी चौक, आदी भागांतील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, आदींचे आगाऊ आरक्षण व विक्रीत वाढ झाली आहे. विशेषत: सोन्याचा दरही नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून उतरण्यास सुरुवात झाल्याने त्याच्याही खरेदीचा ओघ वाढला आहे.

प्रामुख्याने ब्रँडेड सोन्याच्या व्यापाऱ्यांसह गुजरी, भाऊसिंगजी रोड, आदी परिसरांतील पारंपरिक सराफी दुकानांवरही महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. त्यामुळे कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे खºया अर्थाने बाजारपेठेत उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMarketबाजारkolhapurकोल्हापूर