शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कला प्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:13 IST

माणगाव (जि. सावंतवाडी) येथील कलाकार ऋतिका विजय पालकर हिच्या कलाप्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोल्हापूरकरांना घडत आहे. या प्रदर्शनाला राजर्षी शाहू स्मारक भवनमधील कलादालनात रविवारी सकाळी प्रारंभ झाला.

ठळक मुद्देकला प्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शनऋतिका पालकर हिने साकारलेल्या कलाकृतींचा समावेश; शनिवारी समारोप

कोल्हापूर : माणगाव (जि. सावंतवाडी) येथील कलाकार ऋतिका विजय पालकर हिच्या कलाप्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोल्हापूरकरांना घडत आहे. या प्रदर्शनाला राजर्षी शाहू स्मारक भवनमधील कलादालनात रविवारी सकाळी प्रारंभ झाला.या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. ओरिगामी आर्टिस्ट मंदार वैद्य प्रमुख उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, निसर्गातील दगडांचा योग्य वापर करून साकारलेल्या या कलाकृती लक्षवेधक आहेत. त्यातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडते. या प्रदर्शनातून कोल्हापूरकरांना वेगळ्या कलाकृतींचे दर्शन घडणार आहे.

वैद्य म्हणाले, ‘स्टोन आर्ट’द्वारे उत्तम कलाकृती ऋतिका हिने साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकृतीचे वेगळेपण आहे. त्यांना एक ग्रामीण टच आहे. या कार्यक्रमास अ‍ॅड. चारूलता चव्हाण, विजय पालकर, श्वेता पालकर, चिन्मय साळोखे, ओंकार पालकर, आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील कला रसिकांनी प्रदर्शन पाहण्यास रविवारी गर्दी केली. हे प्रदर्शन शनिवार (दि. २७) पर्यंत सकाळी १0 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पाहण्यास मोफत खुले राहणार आहे.

स्टोन, पेबल आर्टमधून विविध कलाकृती‘युनिक’ ही संकल्पना घेऊन स्टोन आणि पेबल आर्टचे हे प्रदर्शन कोल्हापुरात मी पहिल्यांदा भरविले आहे. निसर्गातील छोट्या-मोठ्या दगडांचा जो रंग, आकार आहे. ते आहे तसे वापरून त्यातून विविध कलाकृती साकारल्या असल्याचे ऋतिका हिने सांगितले. ती म्हणाली, कोल्हापुरातील या प्रदर्शनात २५ कलाकृतींचा समावेश आहे.

त्यामध्ये गणपती, विठ्ठल, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिरेखा, पाने-फुले, निसर्गाच्या विविध छटा आदींबाबतच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनातून ग्रामीण कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत दिल्ली, मुंबई (गोरेगाव आणि कुलाबा)मध्ये प्रदर्शन भरविली आहेत. कोल्हापूरनंतर पुणे, गोवा येथे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. 

 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर