शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यातील धाडसी दरोडा; अटक केलेल्या पाच जणांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 19:56 IST

दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री तळवडे, आंबा (ता. शाहूवाडी) येथे शांतय्या शंकरय्या स्वामी यांच्या घरावर आठ ते नऊ दरोडेखोरांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने शांतय्या स्वामी व त्याच्या मुलाला मारून जखमी केले होते.

शाहूवाडी  : तळवडे, आंबा (ता. शाहूवाडी) येथे हातपाय बांधून, पिस्तुलाचा धाक दाखवून घातलेल्या धाडसी दरोड्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या पंधरा दिवसांत यश आले. पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून आणखी चौघे पसार आहेत. अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.सचिन रामचंद्र नाचणकर (वय ३७, रा. मु. पो. कोतोली, ता. शाहूवाडी), शिवाजी हरिबा कदम (३६, रा. अमेनी, ता. शाहूवाडी), मंदार तानाजी चोरगे (३७, रा. प्लॉट नं. ३०४, तिसरा मजला, अवधूत कार्टेक, भारती विद्यापीठानजीक, कात्रज, पुणे), नामदेव ऊर्फ अविनाश जालिंदर कदम (२६, रा. सध्या रा. पुणे, मूळ गाव पाडळेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली), शुभम ऊर्फ सोन्या शंकर चोरगे (२२, रा. वांगणी, ता. वेल्हा, जि. पुणे). अशी या पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री तळवडे, आंबा (ता. शाहूवाडी) येथे शांतय्या शंकरय्या स्वामी यांच्या घरावर आठ ते नऊ दरोडेखोरांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने शांतय्या स्वामी व त्याच्या मुलाला मारून जखमी केले. इतर महिलांचे हातपाय बांधून, तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांना खोलीत डांबले. दरोडेखोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लूट करून चारचाकी गाडी चोरून नेली होती. शाहूवाडी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून याचा तपास सुरू केला. दरोड्यातील संशयित आरोपी हे मलकापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून या पाच जणांना अटक केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी