शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

फिल्मफेअरपेक्षाही दानवे पुरस्काराचे मोल अधिक : महेश कोठारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:26 IST

Mahesh Kothare Kolhapur- माझ्या तरुणपणात ज्यांचे बोट धरून चित्रपटसृष्टीत आलो, त्यांच्याच कुटुंबीयांकडून पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. फिल्मफेअरहून या पुरस्काराचे मोल अधिक असल्याची भावना ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते महेश कोठारे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देफिल्मफेअरपेक्षाही दानवे पुरस्काराचे मोल अधिक : महेश कोठारे कलायात्री पुरस्काराने झाला सन्मान

कोल्हापूर : माझ्या तरुणपणात ज्यांचे बोट धरून चित्रपटसृष्टीत आलो, त्यांच्याच कुटुंबीयांकडून पुरस्कार मिळणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. फिल्मफेअरहून या पुरस्काराचे मोल अधिक असल्याची भावना ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते महेश कोठारे यांनी व्यक्त केली.

दानवे कुटुंबीयांतर्फे सोमवारी राजर्षी शाहू स्मारक भवनात कोठारे यांना नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे होते.कोठारे म्हणाले, मला १९७५ ला तरुणपणात अभिनेता म्हणून प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचा प्रीत तुझी माझी हा पहिला चित्रपट मिळाला. त्याच चित्रपटात जयशंकर दानवे हेही होते. त्यांच्याकडून अभिनयातील बारकावे शिकायला मिळाले. विशेष म्हणजे दिग्दर्शक पेंढारकर यांच्याकडे एफटीआयची मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीची लायब्ररी ताब्यात होती. त्यात दानवे यांनी खलनायक म्हणून अभिनय केलेल्या चित्रपट पाहता आले.

दोनच दिवसांपूर्वी मला फिल्मफेअरचा एक्सलन्स अवॉर्डही मिळाला आहे. त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार मला महत्त्वाचा आहे. कारण करवीरनगरीत व भालजी बाबांच्या जयप्रभा स्टुडिओत मी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्या चित्रपटांवर कोल्हापूरकरांनी भरभरून प्रेम केले. हे ऋण माझ्यावर आहेत.

माझ्या तारुण्यातील पहिला चित्रपट आणि त्याच चित्रपटात जयशंकर दानवे यांची कारर्किदीतील शेवटची भूमिका होती. त्यामुळे हा पुरस्कार मला मिळणे माझ्यासाठी आनंदाचा परमोच्च क्षण म्हटले तरी वावगे ठरू नये.स्वागत व प्रास्ताविक जयश्री दानवे यांनी केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनुुपमा चव्हाण व सन्मानपत्र वाचन जाई भागवत यांनी केले. यावेळी आशिष भागवत, सुधीर पेटकर, प्रा. सुजय पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :Mahesh Kothareमहेश कोठारेkolhapurकोल्हापूर