शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

कोल्हापूर जिल्ह्यात बिबटे, गव्यांसह हत्तींची दहशत : वनविभागाकडून तुटपुंजी भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:59 PM

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणाºया नागरिकांना जंगली गव्याच्या त्रासाबरोबर आता बिबट्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरकपारीत राहणारे शेतकरी, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. आतापर्यंत १0 ते १५ शेतकºयांच्या शेळी, मेंढीच्या कळपात बिबट्याने हल्ला करून शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार ...

ठळक मुद्देपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यासह शेळी-मेंढीच्या कळपांवर हल्ले

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील डोंगर-कपारीत राहणाºया नागरिकांना जंगली गव्याच्या त्रासाबरोबर आता बिबट्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरकपारीत राहणारे शेतकरी, नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. आतापर्यंत १0 ते १५ शेतकºयांच्या शेळी, मेंढीच्या कळपात बिबट्याने हल्ला करून शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न शेतकरी विचारत आह.तालुक्यात वनविभागाचे जंगल क्षेत्र व जंगलव्याप्त परिसर मोठ्या प्रमाणात आहे. शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीला लागून चांदोली अभयारण्य आहे. तर विशाळगड, उदागिरी, अणुस्कुरा, बर्की ही जंगले घनदाट आहेत. त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्याला लागूनच कोकणातील तालुक्यातील जंगलाची हद्द आहे. तालुक्यातील गावागावांतील जंगलांमध्ये गव्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे जंगलाशेजारी असणाºया शेतीचे गव्यांकडून मोठे नुकसान केले जात आहे. शेतकºयांना रात्रभर जागून आपल्या पिकांची राखण करावी लागते. त्यामुळेच पिकांचे संरक्षण होत आहे.राधानगरी तालुक्यातील हत्तींचा प्रवेश रोखण्याची मागणीआमजाई व्हरवडे : राधानगरी तालुक्यात टस्कर हत्तीच्या आगमनामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या उपाययोजना तोकड्या ठरत असल्यामुळे तोरस्करवाडी गावात हत्तीने प्रवेश केला आहे. परिणामी, वनविभागाने राधानगरी तालुक्यातील हत्तींचा प्रवेश रोखावा, अशी मागणी होत आहे.दाजीपूर परिसरातील गवे, प्राणी कळपाने चारा आणि पाणी शोधण्यासाठी गुडाळ, सावर्धन, काळम्मावाडी परिसरातील गावात येतात. शेतीमधील पिके फस्त करतात. सावर्धन परिसरात शेतकरी आपल्या पिकांची राखण दिवस-रात्र करीत आहेत. अनेकवेळा गवे, प्राण्यांनी शेतकºयांवर हल्ले केले आहेत. तसेच पिकांचे नुकसान तर होतेच शिवाय भीतीदायक वातावरणात वावरावे लागत आहे.चार महिन्यांपूर्वी टस्कर हत्ती राधानगरी परिसरात आला होता. कर्नाटक, चंदगड, आजरा मार्गे आलेला हत्ती हुसकावून लावताना वनविभागाच्या कर्मचाºयांना नाकीनऊ झाले. हत्ती, गवे यांचे मानवी वस्तीत प्रवेश करण्याचे प्रमाण वाढत आहे. जंगलातील प्राणी आपला अधिवास सोडून दूर अंतरावर चारा, पाणी शोधण्यासाठी येतात, तर काही प्राणी मानवावर हल्ले करतात. ही समस्या राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच आता राधानगरी तालुक्यात हत्तीने प्रवेश केल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1 गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट निर्माण झाले आहे. या तीन महिन्यांत वाकोली, निनाईपरळे, वारूळ, आळतूर, लोळाणे, पुसाळे धनगरवाडा, आळतूर धनगरवाडा, चांदोली धनगरवाडा या गावांमधील वाड्या-वस्त्यांवर बिबट्याने थैमान घातले आहे.2 जवळपास लोळाणे, वारूळ, आळतूर गावांतील शेतकºयांच्या घरात घुसून शेळ्या मारल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलात शेतकरी जनावरे व शेळ्या घेऊन जात आहेत. शेळ्यांच्या कळपावर बिबट्या दिवसादेखील हल्ला करीत आहे. त्यामुळे डोंगरात शेतकरी शेळ्या, जनावरे घेऊन जाण्यास घाबरत आहेत.3 जंगलाशेजारी असणाºया शेतीची राखण करण्यासाठी शेतकरी वस्तीवर जात नाहीत. त्यामुळे जंगली गव्याने शेतीचे नुकसान केले आहे. नदीकाठी असणाºया शेतीला गव्यांचा त्रास होत आहे. पीक हातातोंडाला यायला लागले की, जंगली श्वापदांचा त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या वनविभागाकडून तुटपुंजी रक्कम मिळते. सांगा आम्ही जगायचे कसे?, असा सवाल शेतकºयांमधून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल