शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यालगत खोदाई केल्याने तिलारी कालव्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 17:29 IST

बांदा - सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा तपासणी नाक्याच्या ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदा काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने कालवा विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कालव्यालगत खोदाई केल्याने कालव्याला धोका निर्माण झाल्याचा अहवाल तिलारी कालवा उपविभागाने सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्याच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.

ठळक मुद्देकालव्यालगत खोदाई केल्याने तिलारी कालव्याला धोकापाटबंधारे विभागाच्या बांधकाम विभागाला अहवाल सादर

बांदा : बांदा - सटमटवाडी येथे आरटीओ विभागाचा तपासणी नाक्याच्या ठेकेदाराने विनापरवाना व बेकायदा काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने कालवा विभागाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून कालव्यालगत खोदाई केल्याने कालव्याला धोका निर्माण झाल्याचा अहवाल तिलारी कालवा उपविभागाने सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्याच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.

याबाबत वारंवार लक्ष वेधूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अहवालातून केला आहे. नाक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने हम करे सो कायदा या आविभार्वात विनापरवाना व बेकायदा कामांचा सपाटाच लावला.विनापरवाना पाच हजार वृक्षांची तोड, अनधिकृत खनिजयुक्त माती उत्खनन व विक्री, अनधिकृत बांधकामे, कालव्यालगत खोदाई केली. नैसर्गिक पाणवठे नष्ट केले. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. याविरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी लढा दिला.बांदा शाखा कालव्यालगत केलेल्या खोदाईकडे लक्ष वेधल्यानंतर तिलारी कालवा उपविभाग जागा झाला. खोदाईमुळे कालव्याला धोका निर्माण झाल्याने एमएसआरडीसीचे लक्ष वेधले. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी ठेकेदार कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे कालव्यालगतची माती ढासळून कालवा कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.तसा तब्बल आठ पानी अहवाल तिलारी कालवा उपविभागाने सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाच्या बांधकाम विभागाला सादर केला आहे. यात टोलनाक्याच्या ठेकेदारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणkolhapurकोल्हापूर