शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: नृसिंहवाडीत उतरता दक्षिणद्वार सोहळा, मंदिरातील पाणी होऊ लागले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 12:27 IST

दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करणे योगायोग

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे काल, शुक्रवारी दुपारी एक वाजता चालू सालातील दुसरा उतरता दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रावण महिना असल्याने नृसिंहवाडी परिसरातील अनेक भाविकांनी दक्षिणद्वार सोहण्याचा लाभ घेतला.पावसाने उसंत घेतल्याने व धरणातून होणारा विसर्ग कमी झाल्याने गेले काही दिवसांपासून येथील कृष्णा व पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत होती. नदीची पाणीपातळी कमी झाल्याने आज दुपारी एक वाजता चालू सालातील उतरता दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला आज रात्री उशिरापर्यंत मंदिरातील पाणी कमी होऊन मंदिर दर्शनासाठी सुरू होण्याची शक्यता आहे.दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करणे योगायोगयेथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे वाहते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढलेने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हटले जाते. दक्षिणद्वार सोहळा नदीची पाणी पातळी वाढणे, अगर कमी होणे यावर अवलंबून असतो. त्यामुळे दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान होणे हा योगायोगच असतो.मागील आठवड्यात पावसाच्या संततधारेमुळे कोयना, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे श्री दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. सद्या पावसाने उसंत घेतली असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDatta Mandirदत्त मंदिर