सातार्डेच्या सरपंचपदी दादासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:34 IST2021-02-26T04:34:21+5:302021-02-26T04:34:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क यवलूज वार्ताहर : सातार्डे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कॉग्रेसच्या पांडुरंग पाटील ग्रामविकास आघाडीचे दादासाहेब वसंतराव पाटील ...

Dadasaheb Patil as Sarpanch of Satarde | सातार्डेच्या सरपंचपदी दादासाहेब पाटील

सातार्डेच्या सरपंचपदी दादासाहेब पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

यवलूज वार्ताहर : सातार्डे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कॉग्रेसच्या पांडुरंग पाटील ग्रामविकास आघाडीचे दादासाहेब वसंतराव पाटील यांची, तर उपसरपंचपदी हनुमान ग्रामविकास आघाडीच्या विद्या दत्तात्रय नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी पर्यवेक्षक पन्हाळा. एस. बी. पाटील होते. या निवडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नूतन सदस्यांच्या उपस्थितीत पार पडल्या.

यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा पोवार, सागर रामाणे, छाया पाटील, प्रणाली पाटील, भास्कर कांबळे, तेजस्विनी दमे, तलाठी मेघा जाधव,ग्रामसेविका सुनिता कुंभार , पोलीस पाटील अनिता पाटील, अशोक पाटील, उमाजी गुरव , प्रकाश कांबळे उपस्थित होते. अपक्ष महिला सदस्य संगीता अशोक नाईक या तटस्थ राहिल्याने निवड सभास्थानी अनुपस्थित होत्या. गावात पहिल्यांदाच सरपंचपदासाठीची ही निवडणूक दोन्ही आघाड्यच्या कार्यकर्त्यांनी शांततेत पार पाडून गावात एक नवीन चांगला आदर्श पांयडा पाडला आहे.

फोटो ओळ - सरपंच -दादासाहेब पाटील, उपसरपंच - विद्या नाईक

Web Title: Dadasaheb Patil as Sarpanch of Satarde