शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:33 IST

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ठळक मुद्देसततच्या कर्तव्यामुळे सरावाला मिळेना वेळ; याकरिता कोट्यवधींचा निधी खर्चमात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून

दीपक जाधवकोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या समारोपाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यांनी याबाबत बक्षिसे कमी का मिळाली, याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यांनाही याचे उत्तर देता आले नाही. खरे कारण पाहता सततच्या कर्तव्यामुळे पोलीस खेळाडूंना सरावाकरिता वेळच मिळत नसल्याचे पुढे आले.

पोलीस कर्मचाºयांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून खात्यातर्फे दरवर्षी जिल्हा, परिक्षेत्रीय, तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. हे करीत असताना पोलीस कर्मचाºयांमधील खेळाडूंना खेळापेक्षा कर्तव्यावरच अधिक वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे सरावात सातत्य नसल्याने त्याचा परिणाम स्पर्धेत होतो. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर पोलीस दलाची क्रीडा कामगिरी होय. गेल्या ४५ वर्षांत कोल्हापूर जिल्हा संघाने सुमारे ३0 वेळा विजेतेपद पटकाविले होते. मात्र, सततच्या बंदोबस्ताच्या कर्तव्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंची कामगिरी खालावत चालली आहे. यंदा तर ३६५ दिवसांपैकी सुमारे ३४० दिवस बंदोबस्त आणि उरलेल्या वेळेत कुटुंबासह खेळाच्या सरावासाठी दिले गेले होते. त्यामुळे कामगिरीत घसरण झाली. खरे कारण पाहता खेळाडू म्हणून भरती झालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वरिष्ठ अधिकारी ‘आता खेळ बंद करून कामाला लागा’ अशी शेरेबाजी करतात. मग, सरावाला वेळ कसा द्यायचा? असा यक्ष प्रश्न पोलीस खेळाडूंसमोर आहे.

जानेवारी २०१८ मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा होणार आहेत. इतर जिल्'ातील पोलीस खेळाडूंना तीन महिने अगोदर केवळ सरावासाठी दिले जातात. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंनाही द्यावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून कोल्हापूरचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत कामगिरी कशी करणार, हे न उलघडणारे कोडे आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूर संघाने यापूर्वी आठ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. याबाबत अनेक खेळाडूंनी सरावाला वेळ मिळाला तर ‘दादा आम्ही नक्कीच जिंकू आणि कोल्हापूरचे नाव देशात नव्हे, तर सातासमुद्रापार नेऊ’ असेही बोलून दाखविले.खेळाडूंना वेळ देऊसरावात सातत्य नसल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. हे सततच्या बंदोबस्ताचा ताणामुळे होते. ही बाब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून खेळाडूंना सवलत देऊ असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.