शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर कॉर्नरजवळ गोळीबार-पेट्रोलपंप मालकास अटक; लघुशंका केल्याच्या कारणावरून घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:36 IST

लघुशंका केल्याच्या कारणावरून येथील दाभोळकर कॉर्नर परिसरातील पेट्रोलपंप मालकाने एका प्रवाशाला धमकविण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची घटना गुरूवारी रात्री

कोल्हापूर : लघुशंका केल्याच्या कारणावरून येथील दाभोळकर कॉर्नर परिसरातील पेट्रोलपंप मालकाने एका प्रवाशाला धमकविण्यासाठी हवेत गोळीबार करण्याची घटना गुरूवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दाभोळकर कॉर्नर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी संशयित मुकुंद रामचंद्र यादव (वय ४७, रा. १५८८, बी वॉर्ड, जासूद गल्ली, मंगळवारपेठ, कोल्हापूर) याला शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दाभोळकर कॉर्नर परिसरातील पादचारी पुलाजवळ मुकुंद यादव याचा पेट्रोलपंप आहे. गुरुवारी रात्री पेट्रोलपंपानजीक एक प्रवासी लघुशंका करत होता. ते पाहून यादव याचा भाचा सुनिल तळवडे हा तेथे आला. त्याने या प्रवासाला हटकले. त्यातून दोघांची वादावादी सुरू झाली. थोड्या वेळातच याठिकाणी गर्दी जमली. ही गर्दी पाहून यादव हा पेट्रोलपंपाच्या केबिनमधून तेथे आला. यावेळी जमावातून सुनिल याला मारहाण झाली.

हा जमाव आपल्या अंगावर येणार आणि संबंधित प्रवाशाला धमकविण्यासाठी यादव याने स्वत:जवळील पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यादवचा हा प्रकार पाहून जमावाची पळापळ झाली. त्यामुळे काहीकाळ येथे वातावरण तंग बनले. दरम्यान, हा प्रकार समजताच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी आला. पोलिस आल्याचे पाहताच जमाव पांगला. या प्रकरणी संशयित मुकुंद यादव याला शाहुपुरी पोलिस ठाण्यात पोलिसांनी आणले. त्याच्याकडे या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती. त्यासह संबंधित प्रवाशाकडून या घटनेची माहिती घेण्याचे पोलिसांचे काम सुरू होते.दोन पुंगळ्या सापडल्याघटनास्थळी पोलिसांना दोन पुंगळ्या सापडल्या. त्यांनी या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी यादव याच्यावर खुनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर