शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

विवेकानंद पॅटर्न निर्माण करणाऱ्या डी.ए. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 11:36 IST

: बारावीच्या परीक्षेत ह्यविवेकानंद पॅटर्न निर्माण करत राज्यात कोल्हापूरचा नावलौकिक करणारे विवेकानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दादासाहेब आप्पा तथा डी.ए. पाटील (वय ८६) यांचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माणगाव (ता. हातकणंगले) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, उत्तम प्रशासक, कर्तबगार प्राचार्य अशी राज्यभर ओळख असणारे व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या पश्चात मुलगा रवींद्र, मुलगी सुनंदा हुक्कीरे, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ठळक मुद्देविवेकानंद पॅटर्न निर्माण करणाऱ्या डी.ए. पाटील यांचे निधन वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : कर्तबगार प्राचार्य हरपले

 रूकडी-माणगाव /कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेत ह्यविवेकानंद पॅटर्न निर्माण करत राज्यात कोल्हापूरचा नावलौकिक करणारे विवेकानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दादासाहेब आप्पा तथा डी.ए. पाटील (वय ८६) यांचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माणगाव (ता. हातकणंगले) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, उत्तम प्रशासक, कर्तबगार प्राचार्य अशी राज्यभर ओळख असणारे व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांच्या पश्चात मुलगा रवींद्र, मुलगी सुनंदा हुक्कीरे, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.प्राचार्य पाटील गेल्या दोन वर्षांपासून स्मृतिभ्रंश विकाराने त्रस्त होते. गेल्या आठवड्यापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यातच त्यांची गुरुवारी सायंकाळी माणगाव येथील निवासस्थानी प्राणज्योत मालवली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राचार्य पाटील यांना शिक्षणाची आवड होती. रांगडापणा, शिस्तबध्दता, कष्ट करण्याची तयारी ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टे होती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांचा त्यांना सहवास लाभला होता.

बापूजींच्या मुशीत घडलेल्या प्राचार्य पाटील यांनी प्राचार्यपदावरून काम करताना संस्थेच्या वैभवात भर घालणारी कामगिरी केली. हिंदी विषयात एम.ए झाल्यानंतर माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज हायस्कूल येथे सहायक शिक्षक म्हणून काम केले.

पुढे ए.पी. मगदूम हायस्कूल माणगाव येथे मुख्याध्यापक झाले. तासगाव कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी काम केले. तळमावले येथे प्राचार्यपदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांनी ३० वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपदी काम केले. करडी शिस्त, प्रशासनावर पकड, गुणवत्तेचा ध्यास आणि संस्थेचा विकास या चतुसूत्रीनुसार ते कार्यरत होते.

प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी रचनात्मक कार्य केले. ग्रंथालय, महाविद्यालयाच्या इमारती उभा केल्या. ठिकठिकाणी प्राचार्यपद उत्तमरित्या सांभाळल्यानंतर संस्थेने त्यांना कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सोपविली. या महाविद्यालयाचा त्यांनी कायापालट करत राज्यात दबदबा निर्माण केला. विवेकानंद पॅटर्न निर्माण करत त्यांनी बारावी बोर्ड परीक्षेच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकविले.

बारावीच्या गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी हे विवेकानंद महाविद्यालयाचे असायचे. गुणी शिक्षकांना हेरुन त्यांच्याकडून उच्च दर्जाची कामगिरी करून घेण्याची त्यांची खासियत होती. शिक्षणक्षेत्राबरोबर ते शेतीही करत होते. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले. शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार, इचलकंरजीतील फाय फाउंडेशन, दक्षिण भारत जैन सभेचा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कारासह विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

कार्याचा गौरवविद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देत प्राचार्य पाटील यांनी महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवली. बारावीसह त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीसह कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात महाविद्यालयाला अव्वलस्थानी ठेवले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेने विवेकानंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला त्यांचे नाव दिले.ग्रामीण भागातील अनेकांना नोकरी दिली३५ वर्षांच्या सेवेनंतर सन १९९६ मध्ये प्राचार्य पाटील हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा पाच वर्षे संस्थेने काम करण्याची संधी दिली. विवेकानंद महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर प्राचार्य पाटील यांनी डॉ. डी.वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य म्हणून सात वर्षे धुरा सांभाळली. विवेकानंद शिक्षण संस्थेत आजीव सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना नोकरी दिली. माणगाव येथील एपीएम हायस्कूलचे ते संस्थापक होते. त्यांनी माणगाव येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये पत्नीच्या स्मरणार्थ सभागृह बांधून दिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय