शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

डी. वाय. पाटील विद्यापीठाची शाहू छत्रपती यांना डी. लिट. अरुणकुमार अगरवाल यांना ‘डी. एस्सी.’ : उद्या दीक्षान्त समारंभात पी. चिदंबरम् याच्या हस्ते देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:51 IST

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, शनिवारी होणार

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, शनिवारी होणार आहे. कुलपती डॉ. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया कार्यक्रमात शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’ आणि डॉ. अरुणकुमार अगरवाल यांना ‘डी. एस्सी.’ पदवी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्षडॉ. संजय डी. पाटील आणि कुलगुरू डॉ. प्रकाश बी. बेहेरे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी. पाटील म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत शाहू छत्रपती यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या कार्याच्या सन्मानार्थ विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार आहे. ‘डी. एस्सी.’ पदवीने सन्मानीत केले जाणारे डॉ. अरुणकुमार अगरवाल हे नवी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता आहेत. सध्या ते अपोलो हॉस्पिटलमध्ये नवोपक्रम, शिक्षण आणि क्लिनिकल एक्सलन्सच्या वैद्यकीय सल्लागारपदी कार्यरत आहेत. त्यांनी आयुर्विज्ञान क्षेत्रात संशोधन केले आहे. कुलगुरू डॉ. बहेरे म्हणाले, विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे; त्यामुळे विद्यापीठाला सलग दुसºयांदा ‘नॅक’चे ‘ए’ मानांकन मिळाले. विद्यापीठाला उत्कृष्ट तांत्रिकता पुरस्कार प्राप्त झाला आहे.

‘इंडिया टुडे’ व नेल्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्चिम विभागात तिसरे आणि राष्ट्रीय स्तरावर १५ वे उत्कृष्ट महाविद्यालय ठरले. पीएच. डी. प्राप्त केलेले विद्यार्थी विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईश्वरी कुलकर्णी, लखन खुराणा यांना जागतिक बायोएथिक्स दिवसानिमित्त आयोजित केलेल्या लघुचित्रफीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. या पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे वित्त अधिकारी शाम कोले, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आशालता पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार, प्रा. महादेव नरके, आदी उपस्थित होते.धर्मादाय आयुक्तांकडून कौतुकवैद्यकीय व परिचारिका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परिक्षेत्रातील गरीब, गरजू रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. काही गावेही दत्तक घेतली आहेत. त्याचे धर्मादाय आयुक्तांनी कौतुक केले असल्याचे अध्यक्ष संजय. डी. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.२३० विद्यार्थ्यांना पदवीदीक्षान्त समारंभात पीएच. डी.सह २३० विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी, तर बी. शिवरंजनी, ऐश्वर्या कल्याणी, मुबिना फणीबंद, राहुल पाटील, निकुंज शेखदा, कल्याणी कुलकर्णी, डॉ. अभिनव राऊत यांना सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे, असे कुलसचिव भोसले यांनी सांगितले.