शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -डी. वाय. पाटील रुग्णालयामुळे वाचले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:08 IST

डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय पाटील यांना व्हॉटस्‌ॲपवर नुसता मेसेज करताच त्यांनी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून दिला. वेळेत उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले.

ठळक मुद्देडी. वाय. पाटील रुग्णालयामुळे वाचले प्राणरुग्णाच्या नातेवाईकाची कृतज्ञता : संजय पाटील यांचे मानले आभार

कोल्हापूर : बहिणीला न्यूमोनिया झाल्यावर डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला परंतु सात-आठ दवाखाने पालथे घातले तरी कुणीही दाखल करून घेतले नाही परंतु डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय पाटील यांना व्हॉटस्‌ॲपवर नुसता मेसेज करताच त्यांनी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून दिला. वेळेत उपचार मिळाल्याने बहिणीला जीवदान मिळाल्याची भावना सडोली खालसा (ता. करवीर) येथील राजेंद्र मारुतीराव साळोखे यांनी सोमवारी व्यक्त केली.घडले ते असे : साळोखे यांची बहीण शकुंतला मानसिंग पाटील (रा. कारभारवाडी, ता. करवीर) यांना न्यूमोनिया झाल्याचे व त्यांना तातडीने ऑक्सिजनची आवश्यकता आहे, असे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले. लगेच ते बहिणीला घेऊन कोल्हापूरला उपचारासाठी आले. तोपर्यंत सायंकाळचे सात वाजले होते. त्यांनी ७ ते ८ हॉस्पिटलमध्ये चौकशी केली परंतु कुणीच बेड शिल्लक नाहीत, असे स्पष्ट सांगून दाखल करून घेतले नाही.

काहीही सुचत नव्हते. दीड तास रस्त्यांतच होतो. बहीण गाडीतच होती. अशावेळी माजी आमदार संपतराव पवार यांनी संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला परंतु न झाल्याने व्हॉटस्‌ॲपवर मेसेज केला. संकटकाळी परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात येतो व मदत करतो अगदी तसेच परमेश्वर आपल्या रूपात आमच्या मदतीला आला व आम्हाला कोरोना संसर्गजन्य परिस्थितीतही बेड उपलब्ध करून ऑक्सिजनची सोय करून दिली.

सोमवारी त्यास २४ दिवस झाले बहिणीची प्रकृती आता चांगली आहे. माझी बहिणीस मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्स व सर्व स्टाफ यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. या सर्व कोरोना योद्धांना आमचा सलाम. कधीकाळी आपणास आमची माणूस म्हणून मदत लागली तर एक हाक द्या, अशीही भावना साळोखे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याd y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर