शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शानदार दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 18:21 IST

d y patil university Kolhapur news- तुम्ही निवडलेले वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्य साधेसरळ नाही. हे क्षेत्र वेगाने बदलत आहे. नवसंशोधन, बदलणारे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटीक अँड डेटा ॲनॉलेसिस या सध्याच्या आव्हानांमुळे आरोग्यसेवेवरील खर्च वाढत आहे. ही आव्हाने पेलून सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा द्या, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी बुधवारी येथे केले.

ठळक मुद्देडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शानदार दीक्षांत समारंभ सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा द्या : विजय खोले

कोल्हापूर : तुम्ही निवडलेले वैद्यकीय क्षेत्रातील आयुष्य साधेसरळ नाही. हे क्षेत्र वेगाने बदलत आहे. नवसंशोधन, बदलणारे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटीक अँड डेटा ॲनॉलेसिस या सध्याच्या आव्हानांमुळे आरोग्यसेवेवरील खर्च वाढत आहे. ही आव्हाने पेलून सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा द्या, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांनी बुधवारी येथे केले.येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (अभिमत विद्यापीठ) नवव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हॉटेल सयाजीमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, तर कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.

बस्तवडे (ता. कागल) येथील एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले यांना सन्मानदर्शक डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एससी) पदवी, तर अभिनेता आर. माधवन यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट.) आणि हेरले (ता. हातकणंगले) येथील ८५ वर्षीय शाहीर, कवी कुंतिनाथ करके-पाटील यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट) पदवी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या समारंभात वैद्यकीय शिक्षणातील विविध शाखांमधील ३६१ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.जगाच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सुविधेच्या मर्यादा असूनही कोरोना काळात देशात चांगली कामगिरी झाली. देशातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान नवपदवीधरांनी पेलावे. वैद्यकीय संशोधक, डॉक्टर, औषध निर्मिती करणाऱ्यांनी एकत्रित काम करून आरोग्यसेवा व्यापक करण्याची गरज असल्याचे माजी कुलगुरू डॉ. खोले यांनी सांगितले.

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठkolhapurकोल्हापूर