शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत सिलिंडरचा स्फोट, एक महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:43 IST

स्फोटाच्या तीव्रतेने भिंत फुटली

इचलकरंजी : येथील विक्रमनगर परिसरातील एका घरात घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला. त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. तसेच प्रापंचिक साहित्यांचेही मोठे नुकसान झाले. सुरेखा सुभाष वाघमोडे असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत घटनास्थळ व गावभाग पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विक्रमनगरातील आरगे मळा भागात राहणाऱ्या वाघमोडे कुटुंबीयांनी बुधवारी (दि.२०) रात्री नेहमीप्रमाणे घराची सर्व दारे व खिडक्या बंद करून झोपी गेले. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सुरेखा वाघमोडे यांनी लाइट लावण्यासाठी हॉलमधील बटण सुरू केले असता घरात गॅस गळती होऊन साचून राहिलेल्या गॅसचा स्फोट झाला. त्यामुळे त्या जखमी झाल्या. स्फोटामुळे शेजारच्या घरांतील खिडकीच्या काचा फुटल्या. आरगे मळा परिसरात मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गावभाग पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी जखमी सुरेखा यांना रुग्णालयात हलविले. सुदैवाने त्यांची मुलगी व सासू आतील खोलीत झोपल्या असल्याने त्यांना इजा झाली नाही. तसेच हे दोन मजली घर असून, वरील मजल्यावरील कुटुंबीयही सुखरूप आहेत.घटनेनंतर गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यामध्ये गॅस गळती होऊन स्फोट झाल्याचे आढळले आहे. घरामध्ये रात्रभर गॅसची गळती होऊन तो गॅस साचून राहिला होता. लाइट लावताना बटणामध्ये झालेल्या स्पार्कमुळे साचलेल्या गॅसचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.

स्फोटाच्या तीव्रतेने भिंत फुटलीया स्फोटाची तीव्रता भयानक होती. वाघमोडे यांच्या घराच्या पुढील बाजूची भिंत फुटून पूर्ण चौकटीसह दोन दरवाजे काही अंतरावर संरक्षक भिंतीजवळ जाऊन पडले होते. तसेच घरातील तीन दरवाजे, तिजोरी, इतर साहित्य मोडून पडले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीBlastस्फोट