शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार, दूधगंगा नदीवरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 17:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील दूधगंगा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दुपारी तीनच्या सुमारास घडली. अशोक साताप्पा कोळी (वय ५०, रा. कोळी मळा, कोगनोळी ता. निपाणी ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ठळक मुद्देअज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार दूधगंगा नदीवरील घटना, कागल पोलिस घटनास्थळी 

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी  : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील दूधगंगा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलवरून जाणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार दुपारी तीनच्या सुमारास घडली. अशोक साताप्पा कोळी (वय ५०, रा. कोळी मळा, कोगनोळी ता. निपाणी ) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलावर कागलहुन  कोगनोळीकडे येणाऱ्या अशोक साताप्पा कोळी यांच्या सायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कोळी हे सुमारे पंधरा फूट अंतरावर जाऊन पडले. त्यांच्या पाठीला व डोक्याला जबर मार लागला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बि. एस. तळवार, कोगनोळी पोलीस आऊट पोस्टचे अमर चंदनशिव, पी.एम. घस्ती, एस. बी. खोत यांनी भेट दिली. घटना कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कागल पोलिसांना पाचारण करण्यात आले.

कागलचे पोलिस निरिक्षक दतात्रय नाळे, हवालदार इंद्रजीत शिंदे व कॉन्स्टेबल सुरज कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर कागल येथील शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक