शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड कापताना कटर लागून सुताराचा मृत्यू, लोणार वसाहतीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:53 IST

लोणार वसाहत येथील वखारीत लाकूड कापत असताना कटर लागून सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीकांत विश्वनाथ लोहार (वय ४०, रा. सुतारवाडा, दसरा चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या उजव्या पायाची मांडी कापून रक्तस्राव होऊन त्यांचा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देलाकूड कापताना कटर लागून सुताराचा मृत्यू लोणार वसाहतीतील घटना

कोल्हापूर : लोणार वसाहत येथील वखारीत लाकूड कापत असताना कटर लागून सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीकांत विश्वनाथ लोहार (वय ४०, रा. सुतारवाडा, दसरा चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या उजव्या पायाची मांडी कापून रक्तस्राव होऊन त्यांचा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांनी सांगितले, श्रीकांत लोहार हे गेली २५ वर्षे सुतारकाम करीत होते. आठ दिवसांपूर्वी ते लोणार वसाहत येथील प्रकाश सखाराम वडणकर यांच्या वखारीमध्ये कामाला जात होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले.

वखारीत लाकूड कापत असताना कटर अचानक त्यांच्या उजव्या मांडीवर गेल्याने ती कापली जाऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. बेशुद्धावस्थेत त्यांना सहकाऱ्यांनी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेची माहिती समजताच सुतारवाडा येथील त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. श्रीकांत यांचा स्वभाव प्रामाणिक आणि कष्टाळू होता. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांचे चुलत भाऊ कुंडलिक दत्तात्रय लोहार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची वर्दी दिली. 

 

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर