शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

‘झेंडू’च्या दराने ग्राहकांना घाम : ऐन सणासुदीत दरात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:02 IST

प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच बाजारात नसल्याने दर दुप्पट झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात फुलांच्या टंचाईने ग्राहकांना मात्र घाम फुटला आहे.

ठळक मुद्दे‘झेंडू’च्या दराने ग्राहकांना घाम : ऐन सणासुदीत दरात दुप्पट वाढमहापुराच्या फटक्याने फूलशेतीचे मोठे नुकसान

राजाराम लोंढेकोल्हापूर : प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच बाजारात नसल्याने दर दुप्पट झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात फुलांच्या टंचाईने ग्राहकांना मात्र घाम फुटला आहे.महापुरामुळे कोल्हापुरात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. नदी, ओढ्यांजवळ असलेली पिके पुराच्या पाण्याने गेली; पण इतर ठिकाणची पिके अतिवृष्टीने वाहून गेली आहेत.

खरीप पिकांबरोबरच फूलशेतीचेही नुकसान झाले असून, फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत. श्रावणापासून विविध सण सुरू होत असल्याने शेतकरी मेपासून फूल रोपांची लागण करतात. साधारणत: अडीच-तीन महिन्यांनी फुले लागण्यास सुरुवात होते. यातील बहुतांशी बागांचा अतिवृष्टी व महापुराने सुपडासाफ झाला आहे.

फूलबाजारात आवक एकदम रोडावली असून, मागणी जास्त आहे. श्रावण महिन्याचा सांगता होत असताना पूजा-अर्च्या अधिक असतात. त्यातच आठ-१0 दिवसांवर गणेशोत्सव आल्याने व्यापाऱ्यांची घालमेल सुरू झाली आहे.एरव्ही घाऊक बाजारात भगवा, पिवळा झेंडू ४० रुपये, तर निशिगंध ८०-९० रुपये किलो असायचा. सध्या भगवा झेंडू १०० रुपये, तर पिवळा झेंडू ७० रुपये किलो झाला आहे. किरकोळ बाजारात १६० रुपये किलोपर्यंत दर पोहोचल्याने ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.गलाटा फुलाच्या दरातही दुप्पट वाढ झाली असून, १५० रुपये किलो दर सुरू आहे. कोल्हापूर बाजारात राशिवडे, कंदलगाव, गडमुडशिंगी, हेर्ले, वडगाव, आष्टा, बागणी, किणी, वाठार यांसह मिरज येथूनही माल येतो. त्याचा परिणाम थेट फुलांच्या हारावर झाला असून, १५0 ते २00 रुपये हाराची किंमत आहे.

किरकोळ व्यापारी घरातचकोल्हापुरातून फुले खरेदी करून त्याच्या माळा विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात मासिक गिºहाईक असल्याने या दराने माळा देणे परवडत नाहीत.

गणेशोत्सवात दर गगनाला भिडणारआगामी गणेशोत्सवात फुलांचा दर गगनाला भिडणार आहेत. त्यानंतर येणाऱ्या दसरा आणि दिवाळीत पूजेसाठी फुले उपलब्ध होणार का? अशी भीती व्यापाऱ्यामधून व्यक्त होत आहे.

घाऊक बाजारातील फुलांचे दर प्रतिकिलो असे-

  • भगवा झेंडू-१००,
  • पिवळा झेंडू-७०,
  • निशिगंध-२००,
  • गलाटा-१५०,
  • शेवंती -१३०.

 

अतिवृष्टी व महापुराने फुलांच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आवक कमी असल्याने दर तेजीत आहे, आगामी सणासुदीच्या काळात हे दर आणखी भडकतील.- सर्जेराव माळी (शेतकरी) 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर