शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बागल चौकात कुशनचे दुकान खाक चार दुकानांना झळ : लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:08 IST

या मार्केटमध्ये दुकानगाळ्यात पोटमाळ्यावरील मोठ्या गोदामामध्ये कुशन कव्हरसह शेजारील दुकानाचे हार्डवेअरचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते, त्यालाही आग लागून ती भडकली. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाºया आंबले कुटुंबीयांना तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देआग विझविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न

कोल्हापूर : बागल चौक येथील लक्ष्मीबाई आंबले मार्केटमधील कुशन कव्हरच्या दुकानाला बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे कुशनचे साहित्य खाक झाले. तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाचे तीन बंब आणि परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले; पण ही धुमसणारी आग विझविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरूच होते. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

बागल चौकातील सुधाकर कुशन कव्हरच्या दुकानातून रात्री साडेदहाच्या सुमारास धुराचे लोट बाहेर येत असल्याचे बागल चौकातील कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण कुशन कव्हरचे साहित्य जळत असल्याने आगीची तीव्रता वाढली. त्यामुळे नागरिकांनी बागल चौकात मोठी गर्दी केली. दुकानाशेजारील लक्ष्मी हार्डवेअर व यशोधन पानशॉपलाही आगीची झळ लागून काही साहित्य जळाले. या मार्केटमध्ये दुकानगाळ्यात पोटमाळ्यावरील मोठ्या गोदामामध्ये कुशन कव्हरसह शेजारील दुकानाचे हार्डवेअरचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते, त्यालाही आग लागून ती भडकली. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाºया आंबले कुटुंबीयांना तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

तातडीने प्रतिभानगर फायर स्टेशनची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीची तीव्रता कळल्याने ताराराणी चौक, टिंबर मार्केट येथील असे एकूण तीन बंब तातडीने पाठोपाठ पोहोचले. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी रणजित चिले, मनीष रणभिसे, दस्तगीर मुल्ला व १० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले.दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळलागाळ्यांमध्ये इतर हार्डवेअर, फर्निचरची अनेक दुकाने आहेत. सुदैवाने त्यांना हानी पोहोचली नाही. स्थानिक बागल चौक मंडळाचे कार्यकर्ते ,नागरिक व अग्निशमन विभागाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर