शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता : काऊंटडाऊन सुरू-लॉकडाऊन वाढणार की शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 12:25 IST

दोन दिवसांनी म्हणजे ३ मे रोजी दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत पूर्ण होत आहे. देशात अद्यापही कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुन्हा लॉकडाऊनची मुदत वाढविणार की शिथिल करणार, हा शहरातील चर्चेचा विषय बनला आहे.

ठळक मुद्देमुळे पंतप्रधान मोदी पुन्हा लॉकडाऊनची मुदत वाढविणार की शिथिल करणार, हा शहरातील चर्चेचा विषय बनला आहे. कोल्हापुरातील काही व्यावसायिकांनी लोकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत दुकाने उघडून कामाला सुरुवात केली आहे.

कोल्हापूर : लॉकडाऊन वाढणार की शिथिल होणार याबद्दल संपूर्ण कोल्हापूरकरांमध्ये उत्सुकता लागून आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत रविवारी (दि. ३) पूर्ण होत आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी किरकोळ स्वरूपात व्यवसायाला सुरुवात केली. दोन दिवसांनी पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू होतील, या आशेने काहींनी दुकानांची स्वच्छता, रंगरंगोटी सुरू केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केला असून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. अखंड सव्वा महिना व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. दोन दिवसांनी म्हणजे ३ मे रोजी दुसºया टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत पूर्ण होत आहे. देशात अद्यापही कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुन्हा लॉकडाऊनची मुदत वाढविणार की शिथिल करणार, हा शहरातील चर्चेचा विषय बनला आहे.संयम सुटतोयमोदींनी प्रथम १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले होते. यानंतर रुग्ण वाढतच असल्याने पुन्हा ३ मेपर्यंत यामध्ये वाढ करण्यात आली. अखंड सव्वा महिना घरात थांबल्यामुळे नागरिकांचा संयम सुटत आहे. अनेकांसमोर आर्थिक संकट उभे आहे. परिणामी ३ मे रोजीची वाट न पाहता काहींनी किरकोळ स्वरूपात व्यवसाय सुरू केले आहेत. टोपी, रुमाल, बरण्या, होजिअरी, पत्रावळ्यांच्या विक्रीसाठी काही फेरीवाले रस्त्यांवर आहेत. काहींनी अर्धी दुकाने उघडून छुप्या पद्धतीने व्यवसाय सुरू केला आहे.बाजारपेठेत लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वीच गर्दीजिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसतानाही नागरिकांची मात्र बाजारपेठेत गर्दी कायम आहे. लक्ष्मीपुरी, निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, ताटाकडील तालीम परिसर, महापालिका परिसर या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस