शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Kolhapur : अनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:46 IST

CoronaVirus In Kolhapur : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.

ठळक मुद्देअनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी पूर्ववत व्यवहार सुरू होण्याची प्रतीक्षा

कोल्हापूर : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता ओसरत चालला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ शहरे ही पूर्णत: अनलॉक होत आहेत. म्हणजेच तेथील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. एकीकडे सर्व व्यवसाय सुरू होण्याची आस लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या स्तर चारमध्ये समावेश आहे.जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ सकाळी अकरापर्यंत होती ती आता दुपारी चारपर्यंत वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी आज, सोमवारपासून होणार आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून घरात थांबलेल्या कोल्हापूरवासीयांना कधी एकदा घरातून बाहेर पडतोय, असे झाले आहे. त्याची प्रचिती रविवारीच आले.

रविवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी झाली. भाजी मंडई सध्या बंद ठेवल्या असल्या तरी मंडईला लागून असलेल्या रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक रस्ते नागरीक, विक्रेत्यांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी बाजारपेठेत फेरफटका मारला असता फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता.गेले दीड महिना शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. शहरात संचारबंदी, कडक निर्बंध, कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहिले. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याने सुरू होत असल्याने प्रत्येक व्यक्तीला, दुकानदारांना, व्यावसायिकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा एकदा जीवनाची विस्कटलेली घडी सुधारायची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर