शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाडव्याच्या मुहूर्तावर करोडोंची उलाढाल : कोल्हापूर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 01:00 IST

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, चारचाकी, दुचाकी, फर्निचर, स्मार्टफोन खरेदीची कोटींची उलाढाल झाली. पारंपरिक खरेदी म्हणून ...

कोल्हापूर : दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, चारचाकी, दुचाकी, फर्निचर, स्मार्टफोन खरेदीची कोटींची उलाढाल झाली. पारंपरिक खरेदी म्हणून तयार सोन्याचे दागिने, चांदीच्या आलंकारिक वस्तूंचीही उलाढाल तेजीत राहिली. विशेष म्हणजे सोन्याचा भाव बत्तीस हजारांच्या जवळपास पोहोचला होता; तरीही सोन्याची झळाळी काही कमी झाली नाही. दिवसभरात मुहूर्ताच्या खरेदीचा गुरुवारी (दि. ८) ग्राहकांनी मुक्तपणे आनंद लुटला.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या मुहूर्तावर खरेदी केली की घरी समृद्धी नांदते, या भावनेमुळे प्र्रत्येकजण कमी-अधिक प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी करतात. यात दिवाळीकडे हिंदूंच्या सणांतील मोठा सण म्हणून बघितले जाते.यात वर्षभर साठविलेले पैसे, बोनस, आदींमधून ही खरेदी केली जाते. वर्षभरात त्यासाठी आर्थिक नियोजन केले जाते. यातून अनेक नागरिकांनी विशेषत: महिलांनी सोन्या-चांदीची दागिने खरेदी केली. काही ज्वेलरी दुकानांत सोन्याच्या प्रत्येक खरेदी केलेल्या दागिन्यांचा विमा उतरवून दिला जात होता.

यासह एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, ओव्हन, फूड प्रोसेसर, मोबाईल, होम थिएटर यासारख्या वस्तूंना अधिक मागणी होती. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी शाहूपुरी, बिंदू चौक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, टेंबे रोड, शाहू स्टेडियम, मंगळवार पेठ, उमा टॉकीज, आदी परिसरांत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नवीन वस्त्रे खरेदीबरोबरच चारचाकी, दुचाकी, आदी गाड्यांना मोठी मागणी होती. त्यामुळे वाहनविक्रीची दुकानेही सकाळपासूनच गर्दीने फुलली होती. त्यामुळे दुचाकी, चारचाकीची पूजा करतानाचे चित्र शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागांतही पाहावयास मिळाले. या सर्व वस्तूंवर विविध वित्तीय संस्थांतर्फे आकर्षक वित्तीय साहाय्यता पुरविण्यात आली होती. मोबाईल फोन, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, फर्निचर, आदींच्या खरेदीसाठी विविध योजना विक्रेत्यांनी जाहीर केल्याने त्यास ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. दुपारनंतर ही सर्व विक्रेत्यांची दुकाने रात्री उशिरापर्यंत अक्षरश: ओसंडून गेली होती.

वॉशिंग मशीन, फ्रीजची मागणी वाढलीहजारो रुपयांची खरेदी एकदम करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे अनेकजणांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर डाउन पेमेंट भरून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली. विशेषत: वॉशिंग मशीन, फ्रीजला अधिक मागणी होती, अशी माहिती हेडा एंटरप्रायझेसचे योगेश हेडा यांनी दिली.तयार सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मागणी अधिकयंदा पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा दर जवळजवळ ३२,००० रुपये प्रतितोळा होता. तरीही चोख सोन्याबरोबरच तयार दागिन्यांच्या खरेदीलाही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. विशेषत: चढा दर असूनही ग्राहकांनी मुहूर्ताची खरेदी म्हणून तयार दागिन्यांसह चोख सोने यांच्या खरेदीला अधिक पसंती दिली, अशी माहिती अनघा ज्वेल्सचे कुणाल लडगे यांनी दिली.फर्निचर खरेदीही झोकातगृहोपयोगी वस्तूंमध्ये गृहसजावटीचा महत्त्वाचा भाग म्हणून फर्निचरचा समावेश आहे. त्यामुळे पाडव्याचा मुहूर्तावर ग्राहकांनी सोफासेट, डायनिंग टेबल, आदी अद्ययावत फर्निचरला पसंती देत खरेदीचा आनंद लुटला, अशी माहिती महालक्ष्मी फर्निचरचे विजय शिंदे यांनी दिली.मोबाईल खरेदीलाही अधिक पसंतीविविध कंपन्यांच्या ब्रँडेड स्मार्टफोन्सवर विविध वित्तीय संस्था व स्वत: विक्रेत्यांनी दिलेल्या योजनांमुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात फोन खरेदी केली. यात आॅनलाईन खरेदीपेक्षा विक्रेत्यांनी दिलेल्या योजनांना ग्राहकांनी अधिक प्रतिसाद दिला, अशी माहिती एस. एस. कम्युनिकेशन अ‍ॅन्ड सर्व्हिसेसचे अतुल भांड यांनी दिली.वाहन खरेदीही सुसाटपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकीच्या खरेदीबरोबरच सुमारे सहाशेहून अधिक चारचाकींचीही विक्री झाली. यात स्टायलिश, आरामदायी, अत्याधुनिक गाड्यांना अधिक मागणी होती, अशी माहिती साई सर्व्हिसच्या सेल्स मॅनेजर वंदना मोहिते यांनी दिली. 

दसऱ्याच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या कपडे खरेदीला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात ब्रँडेड कंपन्यांच्या शर्ट, ट्राऊझर्स, अशा एक ना अनेक तयार कपड्यांच्या खरेदीला युवावर्गाने पसंती दिली.- सतीश माने, व्यंकटेश्वरा गारमेंटससर्वसामन्यांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीच्या वस्तूंच्या किमतीमुळे ग्राहकांनी खरेदीचा उत्सव साजरा केला. विशेषत: ‘एकाच छताखाली’ अनेक वस्तूंच्या खरेदीला अधिक पसंती दिली.- व्यंकटेश बडे, लकी बझार

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंDiwaliदिवाळी