शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सन्मानच्या लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम : दौलत देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:41 IST

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

ठळक मुद्देशेतकरी सन्मानच्या लाभार्थ्यांसाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम : दौलत देसाई  कृषी मंत्रालयाचे आदेश

कोल्हापूर : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज घेतलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज पुरवठा या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.जिल्ह्यामध्ये ४ लाख ४७ हजार ८५६ शेतकरी या योजनेचे लाभार्थी असून, यापैकी ३ लाख १३ हजार ८०८ शेतकºयांना पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्तीय संस्था तसेच बँकांकडून पीक कर्ज न घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ३४ हजार ४८ इतकी आहे. या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ फायनान्शियल सर्व्हिसेस तथा कृषी मंत्रालयाकडून आदेश देण्यात आला आहे.या शेतकºयांना अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेमधून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे, तेथे संपर्क साधावा.

कोणतेही कर्ज न घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) योजनेंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

ही विशेष मोहीम दि. २५ तारखेपर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर