शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कोल्हापूर बंद दडपल्यास गंभीर परिणाम आंदोलक नेत्यांचा इशारा : मराठा आरक्षणप्रश्नी आज बंद; भगवी लाट अवतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 01:13 IST

मुख्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आज, गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ हा कोणत्याही स्थितीत होणारच! त्यामुळे

कोल्हापूर : मुख्यमंत्री हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण आज, गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ हा कोणत्याही स्थितीत होणारच! त्यामुळे ‘बंद’मध्ये कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सकल मराठा ठोक मोर्चाच्यावतीने दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, नागरिकांनी सकाळी दसरा चौकात एकत्र येऊन शांततेने आंदोलन करावे, असे आवाहनही यावेळी केले.

आज, गुरुवारी सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने ‘कोल्हापूर बंद’चे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर देसाई म्हणाले, गेले चौदा दिवस आंदोलन शांततेत सुरू असताना पोलीस एकीकडे शांततेसाठी बैठका घेत आहेत; तर दुसरीकडे मराठा आंदोलन मोडण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ग्रामीण भागातून येणारी वाहतूक पोलिसांनी अडवू नये, असेही आवाहन केले.

यावेळी हर्षल सुर्वे, वसंत मुळीक, प्रसाद जाधव, जयेश कदम, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, संदीप पाटील, उमेश पोवार, गणी आजरेकर उपस्थित होते.'दडपण नको : दसरा चौकात याआज, गुुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात आली असून, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी दसरा चौकात यावे. पोलीस काही गावांत भेटून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला भीक घालू नका, असे आवाहन आंदोलकांनी केले असून;पोलिसांच्या आडमुठ्या धोरणाने गंभीर गोष्ट घडल्यास त्याला शासनच जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी दिला.मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाहीमुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेचा वापर करून आंदोलन मोडीत काढत आहेत. त्याबद्दल त्यांचा निषेध करून, आंदोलकात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना घराबाहेर पडू देणार नसल्याचा इशारा इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत आणि स्वप्निल पार्टे यांनी दिला.‘गोकुळ’चे आज दूध संकलन बंदकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ‘महाराष्टÑ बंद’च्या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी सकाळचे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळचे संकलन मात्र केले जाणार आहे.बंद काळात तोडफोड होऊ नये आणि मराठा समाजाने केलेल्या आवाहनास पाठिंबा देण्यासाठी ‘गोकुळ’ने दूध संकलन बंद केले आहे. ‘गोकुळ’चे सकाळी साधारणत: साडेसहा लाख लिटर संकलन होते. एवढे दूध घरात राहणार आहे. मात्र सायंकाळचे संकलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.‘गोकुळ’ने एकवेळचे दूध संकलन बंद केल्याने पुणे, मुंबईतील दूध वितरणावर त्याचा परिणाम होऊ नये, याचे नियोजन संघाने केले आहे. मुंबईत रोज सात लाख लिटर दूध वितरित होते. सकाळ व सायंकाळी दुधाचे ४० टॅँकर मुंबईकडे जातात. संपामुळे गुरुवारी मुंबईकडे टॅँकर जाणार नाहीत. संप गृहीत धरून संघाने अगोदरच त्याची पूर्तता केली आहे. बुधवारी (दि. ८) नियमित ४० टॅँकर जाऊन रात्री उशिरापर्यंत १५-२० टॅँकर पाठविले आहेत. 

नगरसेवक बंदमध्ये सहभागी होणारकोल्हापूर : महानगरपालिकेतील कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसचे नगरसेवक आज, गुरुवारच्या कोल्हापूर बंदमध्ये सहभागी होणार आहेत. पक्षाच्या पातळीवरच त्यांना तसे निरोप देण्यात आले आहेत.ठिय्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून कॉँग्रेस व राष्टÑवादीचे नगरसेवक सहभागी झाले आहेत. महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, राष्टÑवादीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव यांच्यासह सर्वच नगरसेवक रोज सकाळी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावत होते. ताराराणी आघाडीचे नगरसेवकसुद्धा आंदोलनात सक्रिय आहेत. गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह ताराराणीचे नगरसेवक व्यासपीठावर येऊन गेले आहेत. याऊलट भाजपचे नगरसेवक आंदोलनाकडे फिरकले नाहीत. आजच्या कोल्हापूर बंदमध्ये सहभागी होण्याच्या सूचना कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा