शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

चिपरी ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार

By admin | Updated: March 26, 2015 00:27 IST

वॉटर मीटर प्रकरण : सरपंच, ग्रामसेवकांवर ठपका; कारवाईसंंबंधी ‘कारणे दाखवा’ नोटीस

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर  शिरोळ तालुक्यातील चिपरी ग्रामपंचायतीने वॉटर मीटर बसविण्याच्या प्रकरणात गैरकारभार केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यामुळे ग्रामविकास अधिकारी ए. एन. गोरे व सरपंच सुदर्शन जनगोंडा पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ग्रामसेवक गोरे यांना निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, तर सरपंच पाटील यांना पदावरून काढून का टाकू नये, अशी नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी (दि. २३) दिली आहे. दोघांनाही खुलाशासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.चिपरीची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. वारणा नदीवरील योजनेद्वारे गावात पाणीपुरवठा केला जातो. गावातील नळांना मीटर बसविण्याची प्रक्रिया सन २०१२ मध्ये राबविली. निविदा काढण्यापासून मीटर बसविण्यापर्यंतच्या सर्वच टप्प्यांत शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सुरेश मीरासाहेब भाटिया, मनोज लक्ष्मण राजगिरे, बेबीताई मोहन पांडव, सुमेर नेमीनाथ चौगुले, राजू गणपती कोळी, भगवान जानोबा कांबळे यांनी केली. तक्रारीवरून शिरोळ गटविकास अधिकारी यांच्याकडून चौकशी झाली. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाकडून चौकशी झाली.निविदा अर्जावर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सह्या नाहीत. मान्य दराचा उल्लेख असलेले पानही निविदा अर्जासोबत नाही. करारनामा १८०० रुपयांच्या मुद्रांकावर करणे बंधनकारक असताना १०० रुपयांच्या मुद्रांकावर केलेला आहे. अंदाजपत्रकीय रक्कम रुपये २६ लाख ३० हजार ९९९ च्या एक टक्का बयाणा रक्कम, उर्वरित चार टक्के सुरक्षा अनामत रक्कम ठेकेदारांकडून भरणा केल्याची चलने, नियमानुसार आयकर, व्हॅट, उपकर, विमा व कामानुसार इतर अनुषंगिक शासकीय वसुली व निविदा अर्ज फी भरणा केल्याचे चलन केलेले नाही. निविदा प्राधिकारी, योजनेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी नियमबाह्य निविदा प्रक्रिया राबवून मंजुरी दिल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने ठेकेदाराकडून नियमानुसार वसुली करणे आवश्यक आहे. दहा टक्के दिलेली रक्कम व्याजासह वसूल करावी, असेही चौकशी अहवालात म्हटले आहे.ठपका काय ?ग्रामपंचायतीकडील कामकाजात अनियमितता, आर्थिक अनियमितता, नियमबाह्य कार्यवाही, कर्तव्यात कसूर असा ठपका ग्रामसेवक गोरे व सरपंच पाटील यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ नुसार निलंबनाची कारवाई का करू नये, याचा खुलासा नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत शिरोळ गटविकास अधिकारी यांच्यातर्फे योग्य त्या पुराव्याच्या कागदपत्रांसह करावा, असे गोरे यांच्या नोटिसीमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम ३९ नुसार पदावरून काढून टाकण्याची कारवाई का करू नये, असे सरपंच पाटील यांना दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.