शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:15 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास ...

ठळक मुद्देजिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील, १५८ उपद्रवी गावे पाच हजार पोलिसांची जिल्ह्यावर नजर

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावे आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर पाच हजार पोलीस नजर ठेवून आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. चारच दिवस राहिल्याने प्रचाराला गती आली आहे. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात अनेक छुप्या घडामोडी घडू शकतात. अशावेळी दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिले आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल, शाहूवाडी-पन्हाळा, करवीर, इचलकरंजी मतदारसंघांतील ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावांचा समावेश आहे. त्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू असून ते कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला पाच हजार सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. दंगल काबू, राज्य राखीव, केंद्रीय दल, रेल्वे पोलीस यांच्यासह ओडिसा, कर्नाटक, गोव्यातील १० विशेष पथके दोन दिवसांत बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल परिसरात पोलिसांचे विशेष लक्ष असून दिवसरात्र गस्त सुरू आहे. एखादा अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यात येत्या चार दिवसांत कडक नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करण्याचे आदेश दिले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.मोबाईल बंदीजिल्ह्यात तीन हजार ३२१ मदान केंद्रांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतर्फे मतदान केंद्राच्या परिसराची पाहणी केली जाणार आहे. मतदान केंद्रासह परिसरात मोबाईलचा वापर केल्यास तो जप्त करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.हालचालींवर लक्षमतदानाच्या अखेरच्या टप्प्यात फोडाफोडीचे राजकारण होत असते. अशावेळी पैशांची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुतांश उमेदवार गुंडांचा वापर करत असतात. त्यामुळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह शहरासह, उपनगर, गावागावांतील राजकीय पुढाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.-------------------------एकनाथ पाटील

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाPoliceपोलिस