शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

गुन्ह्यातील वाहने दरीत गायब :आंबाघाट परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 21:51 IST

गुन्हेगारी प्रकारांवर पोलिसांचा अंकुशया भागात आवश्यक आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी रत्नागिरी हद्दीत आंबाघाटात असाच खून करून टाकलेला मृतदेह सडलेला अवस्थेत आढळला. तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात गायमुखाजवळ एक अर्भक करवंदाच्या जाळीत दरीत टाकले होते. वजरे खिंडीतही खून केल्याची तीन वर्षांपूर्वीची घटना आहे.

ठळक मुद्देशाहूवाडीत गुन्हेगारीचे हॉटस्पॉट -- पोलिसांचा अंकुश हवा, फिरत्या गस्त पथकाची गरज

आर. एस. लाड ।आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील आंबाघाट परिसरात वाहने पेटवून देणारे प्रकार नवीन नाहीत. गुन्ह्यात वापरणारी वाहने दरीत सोडणे, पेटवून देणे या घटना अधूनमधून घडताना दिसतात. वाहन पेटवून दिले की, ते तेथेच सडते. त्याची चौकशी करावी, असे यंत्रणेला वाटत नाही. वनभोजनातील चुली विझविण्याची जाणीव नसलेली वृत्ती जंगलाना व डोंगरांना आगी लावून जाते. या घटनांकडे बघत राहणारी उदासिनता येथील जैवविविधता व ऐतिहासिक वारसा यांच्या अस्तित्वाला गालबोट लावणारी ठरत आहे.

गुन्हेगारी प्रकारांवर पोलिसांचा अंकुशया भागात आवश्यक आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी रत्नागिरी हद्दीत आंबाघाटात असाच खून करून टाकलेला मृतदेह सडलेला अवस्थेत आढळला. तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात गायमुखाजवळ एक अर्भक करवंदाच्या जाळीत दरीत टाकले होते. वजरे खिंडीतही खून केल्याची तीन वर्षांपूर्वीची घटना आहे. पाच वर्षांपूर्वी चक्रीवळणावर पेट्रोल अंगावर टाकून मृतदेहाचा कोळसा केला होता. घाटात घडणाऱ्या बहुतेक घटना सांगली, कोल्हापूर व सीमाभागातील आहेत. खून करून कोकण हद्दीतील दरीत टाकले की, पंधरा दिवसांत जंगली प्राणी त्याची विल्हेवाट लावत असल्याने पुराव्याअभावी गुन्हेगारी घटनांवर पडदा पडताना दिसतो. आंबाघाटात वाहने लुटली जात होती, तेव्हा गायमुख येथे गस्तपथक तीन वर्षे होते. तेव्हा दरोडे थांबले. आता विशाळगड फाटा व घाटाचे प्रवेशद्वार येथे गस्त घालणारी पथके जरी उभारली, तरी यावर नियंत्रण येईल.

विशाळगडावरील पोलीस औट ठाणे उरूस, अन् महाशिवरात्रीला उघडते. घाट व कोकण यांना जोडणारा आंबा व अनुस्कुरा घाटांत रत्नागिरी विभागाचे पोलीस पथक कार्यरत आहे; पण शाहूवाडी पोलिसांची ठाण्यातून देखरेख राहते. आंबा येथील पोलीस औट ठाणे गेल्या तीन दशकांपासून बंद आहे. ही इमारत कोलमडली आहे. वाढते पर्यटन, नाणीज मठातील वाढलेला भाविक वर्ग, वर्षा पर्यटनाची वाढती क्रेज पाहता या दुर्गम भागात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त व पोलीस मित्र व्यवस्थेची साखळी उभारण्याची गरज आहे. उरूस, सुट्टी, उत्सव या काळात फिरत्या गस्थ पथकाची गरज आहे.

धोकादायक धबधबा स्थळ

  • आठ वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याजवळ असलेला धबधबा पॉर्इंट येथे मद्य सेवन केलेल्या तरुणांनी थेट वाहन दरीलगत नेले. गवतावरून गाडी न वळल्याने सुमो थेट दीड हजार फूट दरीत कोसळून दहाजण जागीच ठार झाले होते. आज तेच ठिकाण तारेने बंदिस्त करून तेथे मनोरा उभारून वनविभागाने सुरक्षित निर्सग पÞॉर्इंट उभारला आहे. अशी रस्त्यालगत दरी, जलसाठे व नदीपात्रे धोकादायक अवस्थेत आहेत; पण तेथे मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही, याचे आश्चर्य वाटते.

कोकण व घाट यावर नियंत्रण ठेवण्यास ब्रिटिश काळात आंब्याच्या सड्यावर पोलीस ठाणी होती; पण आज तेच ठाणे मोडकळीस आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस