क्राईम संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:50+5:302021-01-09T04:18:50+5:30

कोल्हापूर : सदर बाजार परिसरातील ईगल पाईपशेजारी उभ्या करण्यात आलेल्या चारचाकीमधून एक लॅपटॉप व कागदपत्रे, दोन धनादेश अज्ञाताने चोरून ...

Crime Brief | क्राईम संक्षिप्त

क्राईम संक्षिप्त

Next

कोल्हापूर : सदर बाजार परिसरातील ईगल पाईपशेजारी उभ्या करण्यात आलेल्या चारचाकीमधून एक लॅपटॉप व कागदपत्रे, दोन धनादेश अज्ञाताने चोरून नेले. याबाबतची फिर्याद संदीप शिवाजी पाटील (वय ३९, रा. गजानन महाराज नगर, मंगळवार पेठ) यांनी पोलिसांत दिली. यासंबंधी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला.

फिर्यादी पाटील यांनी सदर बाजारातील ईगल पाईप्शेजारील क्रिस्टल प्लाझा इमारतीखाली गुरुवारी (दि. ७) आपली चारचाकी दुपारी दीड ते सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान उभी केली होती. यादरम्यान या चारचाकीची डाव्या बाजूची काच फोडून वीस हजार किमतीचा बॅगेमध्ये ठेवलेला लॅपटाॅप, दोन धनादेश व अन्य महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड हे तपास करीत आहेत.

राजारामपुरीतून दुचाकी लंपास

कोल्हापूर : राजारामपुरीतील एका हाॅटेलसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी नंदिनी धनंजय खुपेरकर (वय ४२, रा. राजारामपुरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

फिर्यादी खुपेरकर यांच्या मालकीची दुचाकी त्यांनी ४ ते ५ जानेवारीदरम्यान राजारामपुरी तेराव्या गल्लीतील टेस्ट ड्राईव्ह या रेस्टाॅरंटसमोर उभी केली होती. ती अज्ञाताने चोरून नेली. याबाबतचा गुन्हा राजारामपुरी पोलिसांत नोंद झाला असून पोलीस निरीक्षक सीताराम डुबल हे तपास करीत आहेत.

Web Title: Crime Brief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.