शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युवतीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा,यादवनगरातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:13 IST

यादवनगरातील नवीन वसाहतीमध्ये एका मंडळाच्या कट्ट्यावर बसलेल्या तरुणीला येथे का बसलात म्हणून तिला शिवीगाळ करून तिच्याशी झटापट करून विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संतोष सुरेश माळी (वय २३, रा. नवी म्हाडा कॉलनी, कोटीतीर्थ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून आपल्यावर चाकूहल्ला केल्याची तक्रार संशयित आरोपींनी पोलिसांकडे केली आहे, त्या प्रकरणी चौघांवर गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देयुवतीच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा,यादवनगरातील प्रकारसंशयित आरोपीची चाकूहल्ल्याची पोलिसांत तक्रार

कोल्हापूर : यादवनगरातील नवीन वसाहतीमध्ये एका मंडळाच्या कट्ट्यावर बसलेल्या तरुणीला येथे का बसलात म्हणून तिला शिवीगाळ करून तिच्याशी झटापट करून विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संतोष सुरेश माळी (वय २३, रा. नवी म्हाडा कॉलनी, कोटीतीर्थ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून आपल्यावर चाकूहल्ला केल्याची तक्रार संशयित आरोपींनी पोलिसांकडे केली आहे, त्या प्रकरणी चौघांवर गुन्हा नोंदविला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी ही नवी म्हाडा कॉलनी येथील रहिवासी आहे. सोमवारी (दि. ११) दुपारी त्या आपल्या मैत्रिणींबरोबर तेथील एका सार्वजनिक मंडळाच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. यावेळी संतोष तेथे आला. तुम्ही इथे का बसता? असा जाब त्याने त्या तरुणींना विचारला. त्यानंतर चिडलेल्या संतोषने त्यांना शिवीगाळ केली. त्यांतील एका तरुणीला जवळ ओढून तिच्याशी झटापट करुन लज्जा उत्पन्न होईल असा प्रयत्न केला.

झटापटीत त्या तरुणीचा शर्ट फाटला. घाबरलेल्या त्या तरुणींनी तेथून पळ काढला. त्याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संतोष माळीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या तक्रारीत विनयभंगासह, संशयित आरोपीने स्टिकने स्वत:च्या डोक्यात मारून जखमी करून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, संतोष माळी यानेही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये चौघांनी घरासमोर येऊन आपल्यावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात उमेश साळुंखे, जुबेर महांबरी, अमन बागवान, इर्शाद बागवान (सर्व रा. यादवनगर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर