शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या विकास खुडेसह पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:27 IST

तवलेल्या पैशांवर ठरल्याप्रमाणे अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर येथील ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेडचा मुख्य कार्यकारी संचालक संशयित विकास जयसिंग खुडे व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेली त्याची पत्नी विद्या विकास खुडे हिच्यासह तीन संचालकांवर मंगळवारी रात्री गुन्हा नोंद झाला.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या विकास खुडेसह पाच जणांवर गुन्हा८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार

कोल्हापूर : गुंतवलेल्या पैशांवर ठरल्याप्रमाणे अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर येथील ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेडचा मुख्य कार्यकारी संचालक संशयित विकास जयसिंग खुडे व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेली त्याची पत्नी विद्या विकास खुडे हिच्यासह तीन संचालकांवर मंगळवारी रात्री गुन्हा नोंद झाला.

अन्य संशयितांमध्ये संचालक प्रसाद आनंदराव पाटील (शिवाजी पेठ, उभा मारुती चौक), सुशील शिवाजी पाटील (यवलूज, ता.पन्हाळा), डॉ. तुकाराम शंकर पाटील (माजगाव, ता पन्हाळा) यांचा समावेश आहे. या प्रकरणी राजू बळिराम सूर्यवंशी (वय ४८, लक्षतीर्थ वसाहत) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हीनस कॉर्नर येथील मातोश्री प्लाझा येथे संशयित खुडे याची ग्रीन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रोडक्टस लिमिटेड या गुंतवणूक कंपन्या आहेत .त्याने नोकरी अधिक नफ्याची अमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून २०१९ पासून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आपल्या कंपनीत करून घेतली आहे. त्याने ही गुंतवणूक केल्याप्रमाणे आणि दिलेल्या हमीप्रमाणे परतावा न देता ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांचा अपहार केला.

याबाबत सूर्यवंशी यानी खुडे दाम्पत्यासह तीन संचालकांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसानी या पाचजणांविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम ( एमपीआयडी ) १९९९चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोद केला. तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर