शांतीनगरमध्ये घराशेजारी उघड्यावर गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी धाड टाकून राखी रामेश्वर तामचीकर (वय २९, रा. शांतीनगर) या महिलेला दारू विक्री करताना ताब्यात घेतले. तिच्याकडून २५ लिटर दारू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील मळ्यातील डीकेटीईच्या मैदानावर मद्यपान करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कपिल रावसाहेब बेडगे (वय २७), गणेश अर्जुन जाधव (३०, दोघे रा. पाटील मळा) आणि दिनेश पुकाराम चौधरी (२८, रा. रेंदाळ बँकेशेजारी) अशी त्यांची नावे आहेत. शांतीनगरमधील आरगे भवन परिसरात उघड्यावर मद्यपान करताना गावभाग पोलिसांना सहाजण मिळून आले. शब्बीर अब्दुल शेख (४३, रा. भाटले मळा), विशाल पद्मसिंग गागडे (३२, रा. शांतीनगर), अरविंद विश्वनाथ मिणेकर (६०, रा. संग्राम चौक), अमीर दस्तगीर मुल्ला( ४८, रा. सम्राट अशोकनगर), वीरेंद्र अच्छेलाल भगत (३९, रा. रेणुकानगर), संजय महेंद्रसिंह जाला (३५, रा. शहापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध व्यावसायिक महिलेसह १० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST