शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा तलाव भरला, पाणी सांडव्यावरुन वाहू लागले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:00 IST

कळंबा : जुलैच्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अवघी तीन फूट पाणीपातळी असणारा कळंबा तलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ...

ठळक मुद्देकळंबा तलाव भरला पाणी सांडव्यावरुन वाहू लागले...

कळंबा : जुलैच्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अवघी तीन फूट पाणीपातळी असणारा कळंबा तलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला आहे. तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर गेली आहे.गेल्या आठवड्यातील मुसळधार व समाधानकारक पावसाने कात्यायनी टेकड्यात उगम पावलेल्या जयंती नदीसह तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने सकाळी कळंबा तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे.तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मनोऱ्यावरून भरलेल्या तलावाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर गेली की तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्या वरून ओसंडून वाहतो येत्या काहीं दिवसात मुसळधार पाऊस बरसल्यास पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने तलावातील पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले आहे. तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने कळंबा पाचगाव व उपनगरातील नागरिकांची यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.हुल्लडबाजाना आवराभरलेल्या कळंबा तलावातील पाणीसाठा पाहण्यासाठी महिला व युवती तलावावर येत असून तलावालगत गाड्या लावून तरुणांचे टोळके हुल्लडबाजी करत असते तर मद्यपी प्रेमी व युगलांचे अश्लील चाळे यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. कळंबा तलावाशेजारी करवीर पोलिस स्टेशनची पोलिस चौकी असून पोलिसांनी हुल्लडबाजांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.पाण्याच्या नियोजनाची गरजयंदा पावसाळ्यापूर्वी तलावात फक्त तीन फूट डेड वॉटर अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक होता पावसाने हुलकावणी दिली असती तर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असती आज समाधानकारक पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी पालिका प्रशासनाने यंदा तरी कळंबा पाचगाव व उपनगरातील पाणीवाटपाचे योग्य नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर