शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनला पोषक हवामान तयार, सर्वांच्या नजरा मान्सूनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 14:15 IST

मान्सूनने कर्नाटक, तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला असून, तो महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देमान्सूनला पोषक हवामान तयारसर्वांच्या नजरा मान्सूनकडे

कोल्हापूर : मान्सूनने कर्नाटक, तमिळनाडूचा बहुतांश भाग व्यापला असून, तो महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत.

जूनचा दुसरा आठवडा सुरू झाल्याने सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला. या वर्षी वेळेत आगमन झाल्याने तो ७ ते ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र अद्याप तो कर्नाटक व तमिळनाडूमध्येच थबकला आहे. त्याने या दोन्ही राज्यांचा बहुतांश भाग व्यापला असून, मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सध्याची स्थिती विचारात घेता राज्यात १२ जूनपासून मान्सून अधिक सक्रिय होईल. त्यामुळे सर्वत्र दमदार पाऊस होऊन १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यभरात मान्सूनची वृष्टी सुरू होईल. तळकोकणातून पुढे सरकताना पुणे व नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होईल, असाही इशारा देण्यात आला आहे़राधानगरी धरणात ४८.९९ दलघमी पाणीसाठा, कोयनेतून २१०० क्युसेक विसर्गकोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.९९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजटाच्या अहवालानुसार कोयना धरणातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४० दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०७.४६ दलघमी, कासारी २५.२२ दलघमी, कडवी २९.६९ दलघमी, कुंभी २७.८० दलघमी, पाटगाव २४.८८ दलघमी, चिकोत्रा १३.९३ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ७.१२ दलघमी, घटप्रभा ११.४४ दलघमी, जांबरे ५.४१ दलघमी, कोदे (ल पा) १.०३ दलघमी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणेराजाराम १०.८ फूट, सुर्वे १०.४ फूट, रुई ३८ फूट, तेरवाड ३२.६ फूट, शिरोळ २६.३ फूट, नृसिंहवाडी २१.६ फूट, राजापूर ११ फूट तर नजीकच्या सांगली ५ फूट व अंकली ५.११ फूट अशी आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर