शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘हृदयस्पर्शी’ साहित्याची निर्मिती व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 01:00 IST

कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्या विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख ...

कोल्हापूर : मन हे हृदयाच्या स्थानी असते. त्यामुळे साहित्य हे हृदयस्पर्शी असले पाहिजे. अशा चांगल्या साहित्यातून समाजाची उन्नती घडते, असे प्रतिपादन करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांनी रविवारी केले.कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व करवीर नगर वाचन मंदिरच्या विद्यमाने आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मनस्विनी प्रभूणे, डॉ. रमेश जाधव, संजीवनी तोफखाने उपस्थित होत्या.शंकराचार्य म्हणाले, केवल साहित्य अजरामर होऊन चालत नाही तर साहित्यिकही अजरामर झाला पाहिजे साहित्यात सर्व रस असतात पण ते कोणत्या अर्थाने वापरायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते. संकेताप्रमाणे ‘शब्द’ वापरले तर ते अर्थासह प्रभावी ठरतात. आजच्या साहित्यात ज्ञानोपासक दिसत नाहीत. ज्ञान आत्मसात करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे.डॉ. ल. रा. नसिराबादकर म्हणाले, या साहित्य संमेलनातून साहित्यप्रेमी व रसिकांचा सुंदर मेळ साधला आहे. संमेलनातून आपल्याला साहित्यांचे विविध पैलू उलगडता येतात.दरम्यान, साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात डॉ. आशुतोष देशपांडे यांनी सुनील पाटील यांची मुलाखत घेतली. दुसºया सत्रात झालेल्या परिसंवादात ‘सामाजिक जीवनात ग्रंथालयांचे स्थान’ या विषयावर डॉ. एस. इनामदार यांनी ग्रंथालयांच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. प्रकाश कल्लोळी मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पालकांनी सजग राहायला हवे. ई-ग्रंथालय ही नवीन संकल्पना आत्मसात केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तिसºया सत्रात परिसरातील साहित्यिक व साहित्य संस्था या विषयावर झालेल्या परिसंवादास भारत सरकारच्या भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते उपस्थित होते. यावेळी डॉ. पी. जी. कुलकर्णी, प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘साहित्य परंपरा’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी रजनी हिरळीकर होत्या. चौथ्या सत्रात झालेल्या कवी संमेलनात सुखदा कु लकर्णी, किरण चव्हाण, जगदीश पाटील, डॉ. दिनेश फडणीस, गुरुनाथ हिर्लेकर, सुरेखा वाडकर, इशा इनामदार, मृदुला बापट, दीपाली चव्हाण, किरण चव्हाण यांनी काव्य सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी मीरा सहस्त्रबुद्धे होत्या. दीपक गाडवे यांनी प्रास्ताविक केले. आशुतोष देशपांडे यांनी परिचय करून दिला. श्रीकृष्ण साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.