शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमध्ये प्लास्टिक सर्जन नसल्याने गेळवडेतील तरुणास हालवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 18:10 IST

गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे राजकीय वादातून झालेल्या मारामारीत हात तुटलेले सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रविवारी (दि. ११) दाखल केले आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्लास्टिक सर्जन नसल्यामुळे लाड यांच्यावर सर्जरी करण्यात आली नसल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उल्हास मिसाळ यांनी सोमवारी सांगितले.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये प्लास्टिक सर्जन नसल्याने गेळवडेतील तरुणास हालवलेउल्हास मिसाळ : सीताराम लाडवर खासगी रुग्णालयात उपचार

कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे राजकीय वादातून झालेल्या मारामारीत हात तुटलेले सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रविवारी (दि. ११) दाखल केले आहे.छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) प्लास्टिक सर्जन नसल्यामुळे लाड यांच्यावर सर्जरी करण्यात आली नसल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उल्हास मिसाळ यांनी सोमवारी सांगितले.गेळवडे येथे रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वादातून शिवसेना व जनसुराज्य शक्ती पक्ष या दोन गटांत मारामारी झाली. यामध्ये आठ जखमी झाले. त्यापैकी पाचजणांवर सीपीआरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. या मारामारीत सीताराम लाड यांचा हात तुटला आहे. त्यांच्यावर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. रुग्णालयात प्लास्टिक सर्जन नसल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात रविवारी दुपारी नेण्यात आले.सीपीआरमध्ये पूर्वी बाहेरून प्लास्टिक सर्जन आणून त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. सध्या सीपीआरमध्ये प्लास्टिक सर्जन नसल्याचे डॉ. मिसाळ यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सीपीआरमध्ये दुपारी आमदार सत्यजित पाटील यांनी जखमींची वॉर्डमध्ये जाऊन विचारपूस केली.

अवघड शस्त्रक्रिया...एखाद्या व्यक्तीचा हात तुटला तर साधारणत: चार ते सहा तासांत तिच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. कारण प्रत्येक नस जोडायची असते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व अवघड असते. जर वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही, तर त्याचा काही उपयोग होत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले. 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर