शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उचलला, लोकमतचा दणका, रुग्ण, नातेवाईकांकडून समाधान व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:20 IST

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) जैव वैद्यकिय कचरा गुरुवारी उचलण्यात आला. याबाबत ‘लोकमत’ मध्ये ‘सीपीआरमध्ये जैव वैद्यकिय कचऱ्यांचे ढिग’ असे वृत्त प्रसिद्धीस झाले. याची गंभीर दखल घेऊन राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासनाने संबधित संस्थेला कचरा उठावण्याचे तत्काळ सूचना केल्या.

ठळक मुद्देसीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उचलला लोकमतचा दणका, सीपीआरकडून गंभीर दखल रुग्ण, नातेवाईकांकडून समाधान व्यक्त

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) जैव वैद्यकिय कचरा गुरुवारी उचलण्यात आला. याबाबत ‘लोकमत’ मध्ये ‘सीपीआरमध्ये जैव वैद्यकिय कचऱ्यांचे ढिग’ असे वृत्त प्रसिद्धीस झाले. याची गंभीर दखल घेऊन राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासनाने संबधित संस्थेला कचरा उठावण्याचे तत्काळ सूचना केल्या.

दिवसभर हा कचरा नेण्यासाठी वाहनाच्या पाच फेऱ्या झाल्या. जैव वैद्यकिय कचरा उठाव केल्यामुळे सीपीआरचे चकाचक झाले. कचरा उठावानंतर रुग्ण, त्यांचे नातेवाईक व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.सीपीआरच्या जैव वैद्यकिय कचरा उठाव करण्याचा ठेका ‘नेचर इन निड’ या खासगी संस्थेला दिले आहे. गेली दहा महिने या संस्थेचे बिल थकीत राहिल्याने हा जैव वैद्यकिय कचरा उठावण्यात आला नव्हता.

त्यामुळे सीपीआरमधील अपघात विभाग, कासारी इमारतीमधील मुख्य शस्त्रक्रिया विभागाकडे जाणाऱ्या जिन्याजवळ तसेच नवजात शिशू बालक अतिदक्षता विभाग, दूधगंगा इमारतीच्या दारात व हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या दारात जैव वैद्यकिय कचऱ्यांच्या पिशव्यांचा ढीगच्या ढिग पडून होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.याचा त्रास रुग्णांसह नागरिकांना होत होता. याबाबत ‘लोकमत’कडे काही सजग नागरिकांनी व्यथा मांडल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी दिवसभर उठावण्यात आलेला जैव वैद्यकिय कचरा कसबा बावडा झुम प्रकल्पात टाकण्यात आल्या.

संबधित संस्थेचे बिल थकीत होते.त्यामुळे जैव वैद्यकिय कचरा उठविला नव्हता. बुधवारी संबधित संस्थेला संपूर्ण बिल अदा करण्यात आले.-डॉ.जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता,राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, कोल्हापूर. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल