शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

देशांतर्गत बाजारपेठेत गाय दूध पावडरच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 2:33 PM

गेले वर्षभर घसरण सुरू झालेल्या गाय दूध पावडरने चांगलीच उसळी घेतली असून, देशांतर्गत बाजारपेठेत २७५ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांत किलोमागे १३५ रुपयांची उसळी दूध टंचाईने पावडर प्लॅन्ट मोकळेच

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेले वर्षभर घसरण सुरू झालेल्या गाय दूध पावडरने चांगलीच उसळी घेतली असून, देशांतर्गत बाजारपेठेत २७५ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. दुष्काळ आणि महापुरामुळे गाय दूध उत्पादनात मोठी घट झाली असून, अनेक खासगी व सहकारी दूध संघांचे दूध पावडर प्लॅन्ट अक्षरश: मोकळे पडले आहेत; त्यामुळे सहा महिन्यांत प्रतिकिलो १३५ रुपयांची वाढ झाली तर बटरचे दरही प्रतिकिलो ३१० रुपये झाला आहे.गाईचे दूध अतिरिक्त झाल्याने राज्यातील दूध संघांनी पावडर तयार केली. पावडरचे उत्पादन जास्त आणि आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारपेठेतील दरात घसरण सुरू झाली. पावडरचे दर प्रतिकिलो १२५ ते १४० रुपयांपर्यंत खाली आल्याने संघांचा तोटा होऊ लागला. परिणामी अनेक खासगी दूध संघांनी गाय दुधाची खरेदीच बंद केली, तर अनेकांनी १७-१८ रुपये लिटर दूध घेतले; त्यामुळे शेतकरीही हवालदिल झाला होता.

राज्यातील अग्रणी असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाला रोज गाईच्या तीन लाख लिटरच्या दुधाची पावडर करावी लागत होती; पण विदर्भातील काही जिल्हे व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पडलेला दुष्काळ, त्यात पश्चिम महाराष्ट्रात  महापुराने दूध उत्पादन कमालीचे घटले आहे.

दूध कमी झाल्याने पावडरचे उत्पादन थंडावले आहे, परिणामी दरात वाढ झाली असून, देशांतर्गत बाजारपेठेत २७५ रुपये किलो दर झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी हा दर १४० रुपयांपर्यंत होता. हळूहळू १०,२० रुपये किलोमागे वाढत वाढत आता २७५ रुपयांपर्यंत पोहोचले. आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत दर अद्याप २१५ रुपयांपर्यंतच आहे.

‘गोकुळ’कडे चिमुटभरही पावडर नाहीएरव्ही शेकडो टन गाय दूध पावडर ‘गोकुळ’कडे पडून असायची; पण सध्या एक किलोही पावडर त्यांच्याकडे शिल्लक नाही. त्याचबरोबर पावडर प्लॅन्ट सध्या दुधाअभावी बंद आहे.‘गोकुळ’ सीमाभागातील निर्बंध उठवलेगाईचे दूध अतिरिक्त झाल्याने ‘गोकुळ’ने सीमाभागातील तालुक्यात ७० टक्के म्हशीचे दूध घालणाऱ्या उत्पादकाकडून ३० टक्केच गाईचे दूध स्वीकारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला होता. आता गाईचे दूध प्रतिदिनी पाच लाख लिटरच्या आत आल्याने सीमाभागातील निर्बंध उठविले असून, येईल तेवढे गाईचे दूध घेतले जात आहे.द्रवरूपात दूध विकणारे आता तोट्यातमध्यंतरी पावडरचे दर कमी होते, त्यावेळी लिक्विडमध्ये दुधाची विक्री करणारे नफ्यात होते. आता परिस्थिती उलटी झाली आहे. बाजारात गाय दूध ३४ ते ३६ रुपये लिटर दर आहे. वाहतूक व पॅकिंग खर्च पाहता, पावडर विक्रीतून जादा पैसे मिळत आहेत.

गाईचे दूध कमी झाल्याने पावडरचे उत्पादन घटले आहे; त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत दर सुधारले असून, ते २७० ते २७५ रुपये किलोपर्यंत आहेत.- रवींद्र आपटे, अध्यक्ष, गोकुळ

 

टॅग्स :milkदूधkolhapurकोल्हापूर