कोल्हापूर : भाऊबंदकीच्या वादातून चुलते व चुलतभावाने लोखंडी सळी व काठीने केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला. तानाजी पांडुरंग पाटील (वय २६, रा. म्हालसवडे, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना करवीर तालुक्यातील म्हालसवडे येथे घडली. या प्रकरणी साताप्पा शिवाजी पाटील व नवनाथ साताप्पा पाटील या दोघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी तानाजी पाटील हे संशयित साताप्पा पाटील यांचे चुलते व नवनाथ हे चुलतभाऊ आहेत. संशयितांनी संगनमत करून हिंदुराव शिवाजी पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी हे भांडण सोडविण्यासाठी तानाजी पाटील हे गेले असता संशयितांनी तुम्हाला जागा वाटून देणार नाही, असे म्हणत त्यांच्यावर काठी व लोखंडी सळीने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तानाजी पाटील हे जखमी झाले. या प्रकरणी दोघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.